सरस्वती विघालयात जागतिक महिला दिनी कायदेविषयक जनजागृती

अर्जुनी मोर.:-
स्थानिक सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर. येथे 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या सन्मान आणि मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशरभाई शिक्षण संस्थेच्या सदस्या मा. सौ. नेहा भुतडा होत्या. कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्त्या मा. नेहा साहू मॅडम न्यायधीश प्रथम श्रेणी दिवानी न्यायालय अर्जुनी मोर, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक डॉ. नंदा गेडाम अधिक्षक ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर, सारिका काटेखाये सरकारी वकील, सारिका बेलेकर, सौ. छाया घाटे माजी उपप्राचार्य, शव्या जैन प्राचार्य, श्रीमती भुते मॅडम, लाडसे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आणि माल्यापैन करून झाली.
महाराष्ट्र शासनाने मुलींच्या जीवनाला सुकर आणि सन्मानाने जगण्यासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहेत, जगात महिलांना सन्मान देण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या साहू मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मुलिंना मार्गदर्शन करताना महिला सक्षमीकरण नाही तर महिला हिच शक्ती आहे. असे मार्गदर्शन नेहा भुतडा यांनी केले.
आजच्या कार्यक्रमाचे संचालन दिपा मेंढे यांनी केले. आणि सर्व मान्यवर यांचे आभार माधुरी वनवे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता इतनी शक्ती दे हमे ना दाता या गीताने करण्यात आली.