सरस्वती विघालयाच्या प्राध्यापिका नंदा नागपुरे यांचा कार्य कर्तुत्वाचा गौरव
Summary
अर्जुनी मोर:- सरस्वती विद्यालयाच्या प्राध्यापिका नंदा नागपुरे या 30 जुन 2025 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या.त्यानिमित्त त्यांचा अग्याराम मदनगोपाल शिक्षण संस्था,सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे यजमानासह सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.बल्लभदासजी भुतडा होते. यावेळी संस्थेचे सचिव […]

अर्जुनी मोर:- सरस्वती विद्यालयाच्या
प्राध्यापिका नंदा नागपुरे या 30 जुन 2025 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या.त्यानिमित्त त्यांचा अग्याराम मदनगोपाल शिक्षण संस्था,सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे यजमानासह सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.बल्लभदासजी भुतडा होते. यावेळी संस्थेचे सचिव सर्वेश भुतडा,प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,माजी तसेच कार्यरत प्राध्यापक व शिक्षक वर्ग व नंदा नागपूरे यांची सुपुत्री धनिष्ठा नागपूरे तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. सेवानिवृत्ती सत्कारानिमित्त नंदा नागपूरे यांचा त्यांच्या यजमानासह शाल,श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.नंदा नागपूरे या सरस्वती विद्यालयात 1996 पासून प्राध्यापिका या पदावर रुजू होऊन जुन2025 पर्यंत कार्यरत होत्या. तेव्हापासून आजतागायत एकोनतीस वर्षे अध्यापनाचे त्या कार्य करीत होत्या.यात त्यांनी समाजशास्त्र, गृहव्यवस्थापन व बालविकास या विषयांचे अध्यापन प्रभाविरीत्या केले.सत्कारमूर्तींचा नियोजनबद्ध कार्याचा अतिशय थाटामाटात हृदयस्पर्शी सन्मान करण्यात आला. संस्थाध्यक्ष डॉ. बल्लभदास भुतडा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना भावी आयुष्याचा शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे, संस्था सचिव सर्वेश भुतडा, शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,माजी तसेच कार्यरत प्राध्यापक व शिक्षक वर्ग यांनी नंदा नागपूरे यांच्या सेवाकार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला व भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा मॅडम प्रति आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना शेळके तर आभार अनिल नंदेश्वर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य केले.