सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई, दि २९ : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य दौऱ्यासाठी मुंबई येथे आगमन झाले. विमानतळ, मुंबई येथे त्यांचे स्वागत राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, अतिरिक्त पोलीस महासंचालक चेरिंग दोरजे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी मयूर भंगाळे यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, न्यायिक अधिकारी, पोलिस अधिकारी आणि विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
०००