हेडलाइन

सरकारी स्वस्त रेती डेपो त्वरित सुरू करा, उप तालुका प्रमुख बंडू पहानपटे शिवसेना ( शिंदे गट) यांची मागणी.

Summary

मा.किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे मार्गदर्शनात तसेच किशोरजी राय संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार यांना निवेदन देऊन सरकारी स्वस्त रेती डेपो त्वरित सुरू करून चंद्रपूर तालुक्यातील शासनाच्या महत्त्वकांशी व नाविन्यपूर्ण योजनाची लाभ बीपीएल […]

मा.किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे मार्गदर्शनात तसेच किशोरजी राय संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार यांना निवेदन देऊन सरकारी स्वस्त रेती डेपो त्वरित सुरू करून चंद्रपूर तालुक्यातील शासनाच्या महत्त्वकांशी व नाविन्यपूर्ण योजनाची लाभ बीपीएल घरकुल लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, मोदी आवास घरकुल योजना, ग्रामीण आवास योजना, अमृत महाआवास, पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजनांचे व इतर घर बांधकामे रेती मिळत नसल्यामुळे थांबली आहे. तसेच रेती अभावी घर बांधकामगार हे रोजगारापासून वंचित आहे . त्यामुळे गरिबांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. सरकारी रेती डेपो सुरू न झाल्यामुळे रेतीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे घरकाम करणारे मजूर,शेतावर जाणारे मजूर, कष्टकरी, शेतकरी, हमाल, छोटे-मोठे व्यावसायिक, रोजंदारी मजदूर इत्यादी रेती खरेदी करू शकत नाही. आपण या गंभीर बाबीचा शासन दरबारी नोंद घेऊन त्वरित स्वस्त रेती डेपो सुरू करावी, अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदन देताना शिवसेना शिंदे गटाचे उप तालुकाप्रमुख बंडू पहानपटे , विवेक पाटील, दिव्यांग मित्र परिवाराचे अध्यक्ष दिलीप मिश्राजी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *