भंडारा महाराष्ट्र रोजगार हेडलाइन

सरकारी नौक-यांचे कंत्राटीकरण करणारा जी आर रद्द करा समता सैनिक दल लाखांदुरच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन असामाजिक व अकल्याणकारी निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा समता सैनिक दला मार्फत संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन केले जाईल

Summary

लाखांदुर प्रतीनीधी , महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आ आ -2013/प्र.क्र.233/कामगार-8 दिनांक 14 मार्च 2023, ला काढलेल्या शासन निर्णयाद्वारे या पुढे सरकारी नौकर भरती बंद करून खाजगी कंत्राटी पध्दतिने नौकर भरतीचा निर्णय घेतला आहे. सदर […]

लाखांदुर प्रतीनीधी ,
महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, व कामगार विभाग शासन निर्णय क्र. आ आ -2013/प्र.क्र.233/कामगार-8 दिनांक 14 मार्च 2023, ला काढलेल्या शासन निर्णयाद्वारे या पुढे सरकारी नौकर भरती बंद करून खाजगी कंत्राटी पध्दतिने नौकर भरतीचा निर्णय घेतला आहे. सदर राज्य शासनाने घेतलेला निर्णय दलित, पिडीत,शोसित,बहुजनांसाठी अत्यंत घातक व धोकादायक आहे. महाराष्ट्रत मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजुर, भूमिहीन, हातकामगारांची बहुजन समाजाची मुले – मुली शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा तयारी करून पास होऊन सरकारी नौकरीत दाखल होत आहेत.परंतु आपल्या एका निर्णयामुळे सर्व सुशिक्षित मुलांचे व पालकांचे स्वप्न भंग होणार असुन बेरोजगार मुला मुलींची घोर निराशा झाली आहे , त्यामुळे विद्यार्थी, पालक, व समाजातील जागरूक नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे
सदर निर्णयामुळे मान्यताप्राप्त संस्थाकडून कुशल, अतीकुशल, अर्धकुशल, व अकुसल अशा प्रकारे व्यवस्थापका पासुन तर मदतनीसा पर्यंत (वर्ग-1,वर्ग-2,वर्ग-3वर्ग-4) सर्वच पद कंत्राटक जो वेतन देईल त्या वेतनावर काम करावे लागेल, त्या कर्मचा-यांना कुढलाही शासकीय संरक्षण मिळणार नाही, सामाजिक आरक्षण राहणार नाही, अशा प्रकारे सामाजिक विषमता वाढेल अत्यल्प पगारामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल,एकुणच अराजकता माजेल,
हजारो वर्षापासुन सामाजिक, राजकीय, आर्थिक विषमतेत जीवन जगणारा बहुजन समाज आपल्या हक्क अधिकारासाठी लढत राहीला परंतु त्यांना त्यांचे हक्क अधिकार दिले गेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये संपूर्ण भारतीयांना त्यांचे मुलभुत अधिकार तसेच भारतात जन्मलेल्या प्रत्येक स्त्री पुरूषांच्या उध्दार व उत्थानासाठी त्यांचे शिक्षण, आरोग,व नौकरी याची जवाबदारी शासनावर देण्यात आली, त्यामुळे आज बहुजन समाजातील लोक सन्मानाने जिवन जगत आहेत. परंतु आपल्या या निर्णयामुळे पुन्हा भारतातील बहुजन समाज गुलामगिरीच्या वाटेवर जाणार आहे
एक कल्याणकारी राज्यासाठी असामाजिक व अकल्याणकारी निर्णय तात्काळ रद्द करून येणा-या अनेक भावी पिडयांचे भविष्य सुरक्षित करावे व जनतेत पसरलेला असंतोष दुर करावा,
सदर निर्णय शासनाने रद्द न केल्यास या निर्णया विराधात समता सैनिक दलामार्फत संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन केले जाईल व होणा-या परीणामास आपण व शासन जबाबदार राहील असा इशारा समता सैनिक दल लाखांदुरच्या वतीने देण्यात आला या वेळी रोशनभाऊ फुले तालुका प्रमुख समता सैनिक दल लाखांदुर, अस्मिता गायकवाड महिला ता प्रमुख, मंगला सरजारे,सुनिल दांभोडे, वनमाला सुखदेवे, शिल्पा बारसागडे, शालु बंन्सोड, क्रिष्णा सुर्यवंशी, तसेच शाखा मडेघाट, चप्राड, खैरी /पट, मांढळ, सराडी/बुज,मासळ,बेलाटी,खैरी/घर,तावशी,पुयार,कन्हाळगाव,चिचाळ,नांदेळ,विरली/बु,खोलमारा,
समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *