समृद्धी मार्ग बांधाच मात्र शेतकरी समृद्धी साठी पी आर डी ए{पांधण रोड डेव्हलपमेंट अथॉरिटी-)ची स्थापना करा स्वप्नील व्यास

कोंढाळी-प्रतिनीधी-
नागपूर -मुंबई समृद्धी महामार्ग- नागपूर-गोवा शक्ती पीठ समृद्धी महामार्ग अत्याधुनिक सर्व सोई सवलती मिळून बांधल्या जात आहे. महाराष्ट्र राज्या साठी अभिभानाची बाब आहे.
पण शेतकरी शेतमजुरांचे समृद्धी मार्गा साठी केंद्र किंवा राज्य सरकार कडे पुरेसा निधी च नसल्याने ग्रामिण भागातील शेतकर्यांचे समृद्धी मार्ग (पांधण रस्ते)अजुनही चिखलाच रूतून बसले आहेत. केंद्र व राज्य सरकारने एन एच ए आय(NHAI)व एम एस आर डी
ए(MMRDA)सारखे बांधकाम यंत्रणा (पांदण रोड डेव्हलपमेंट अथॉरिटी-(PRDA) सारखी बांधकाम यंत्रणा ऊभी करून शेतकरी समृद्धी मार्ग बानविल्यास शेतकरी समृद्ध होईल. आणि ही बाब राज्याचे स्वाभीमानाची ठरेल