गोंदिया महाराष्ट्र हेडलाइन

समता सैनिक दलाची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

Summary

प्रतिनिधी लाखांदूर:- समता सैनिक दल लाखांदूर तर्फे दिनांक ३ सप्टेंबर २०२५ ला संग्रामे हॉल येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. गजेंद्र गजभिये राष्ट्रीय स्टॉप ऑफिसर तसेच आर, सी, फुलुके जि,ओ, सी भंडारा त्याचप्रमाणे […]

प्रतिनिधी लाखांदूर:- समता सैनिक दल लाखांदूर तर्फे दिनांक ३ सप्टेंबर २०२५ ला संग्रामे हॉल येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. गजेंद्र गजभिये राष्ट्रीय स्टॉप ऑफिसर तसेच आर, सी, फुलुके जि,ओ, सी भंडारा त्याचप्रमाणे लाखांदूर तालुका प्रमुख रोशन फुले उपस्थित होते.
समता सैनिक दलाची स्थापना १८ मार्च १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या संघटनेची स्थापना केली. त्याचे प्रमुख उद्देश अस्पृश्यता,जातीभेद, अन्याय शोषण व असमानता या विरोधात लढा देणे आहे आणि हा लढा शिस्तबद्ध आणि निस्वार्थ देणे आहे. यासाठी समता सैनिक दलाची भूमिका सामाजिक समतेचा प्रचार करणे, दलित – वंचित समाजाच्या एक्या साठी संघर्ष करणे,लोकांमध्ये बंधूता,एक्के आणि आत्मसन्मान जागृत करणे हे या संघटनेचे मुख्य उद्देश आहे.असे मत आपल्या मार्गदर्शनात प्रा. राजेंद्र गजभिये यांनी सांगितले आहे.
समता सैनिक दलाचे सैनिक होणे गरजेचे आहे कारण त्यामुळे,बुद्ध, फुले आणि आंबेडकरी विचारांचा प्रचार–प्रसार करण्यासाठी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी घडविण्यासाठी,
समाजाच्या न्याय–अधिकारांचे रक्षण करण्यासाठी,
सुसंस्कारीत व सक्षम युवकवर्ग तयार करण्यासाठी,
नवयुवकांच्या स्वतःच्या व समाजाच्या सुरक्षेसाठी,
पुढील पिढी निडर व शक्तिशाली घडविण्यासाठी,
समाजाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी,
संपूर्ण आत्मसन्मानाने जगण्यासाठी,
युवकवर्गाला व्यसनमुक्त करण्यासाठी,
समाजाच्या एकतेसाठी, समाजातील विभाजनकारी घटकांना तोंड देण्यासाठी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी व प्रेरणेने चालणाऱ्या संस्था–संघटनांना संरक्षण देण्यासाठी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मिशन पुढे नेण्यासाठी त्यामुळे सैनिक दलाचे सैनिक होणे गरजेचे आहे.
६९ हवा धम्मदीक्षा सोहळा वर्धापन दिन दीक्षाभूमी सेवा सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर ते ३ आक्टोंबर २०२५ ला दीक्षाभूमी येथे सर्व सैनिकांनी गणवेशात उपस्थित राहण्याचे आवाहन आर सी फुल्लूके यांनी केले आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका प्रमुख रोशन फुले केले. कार्यक्रमाचे समापन समापन वंद नैन करण्यात आली. या कार्य शाळेला मोठ्या प्रमाणात समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राहुल राऊत कृष्णा सूर्यवंशी भीमराव गायकवाड प्रकाश रामटेके यांनी मेहनत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *