सभागृहात आश्वासन देवून पाच महिन्यात कार्यवाही का नाही विधानसभेत अनिल देशमुखांचा आरोग्यमंत्री सावंत यांना सवाल कोंढाळीच्या ग्रामिण रुग्णालयाचे प्रकरण
Summary
कोंढाळी, प्रतिनीधी-दुर्गाप्रसाद पांडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३ मार्चला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोंढाळी येथील ग्रामिण रुग्णालयाचे काम अर्धवट असुन सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना केली होती. परंतु यावर काहीही कार्यवाही झाली नसल्याने या मुद्दा परत […]
कोंढाळी, प्रतिनीधी-दुर्गाप्रसाद पांडे
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३ मार्चला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोंढाळी येथील ग्रामिण रुग्णालयाचे काम अर्धवट असुन सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना केली होती. परंतु यावर काहीही कार्यवाही झाली नसल्याने या मुद्दा परत अनिल देशमुख यांनी विधानसभेत मांडला. सभागृहात आश्वासन देवून पाच महिन्यात काहीच कार्यवाही का झाली नाही ? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना विचारला.
कोंढाळी हे राष्ट्रीय महामार्गावर असलेले मोठ शहर असुन परिसरातील नागरीकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी अनिल देशमुख यांनी २००८ मध्ये ग्रामिण रुग्णालय मंजुर करुन त्याच्या ईमारतीसाठी साडेचार कोटी रुपये मंजुर केले होते. परंतु नंतर वाढिव काम आणि इतर अडचणीमुळे ते काम पुर्ण होवून शकले नाही. जवळपास ७५ टक्के बांधकाम झाले असून निधी अभावी इतर कामे झाली नाही. यामुळे जवळपास ११ कोटी रुपयाची सुधारीत मान्यता देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. बांधकाम विभाग व आरोग्य विभागाचा संयुक्त प्रस्ताव तयार करुन तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. परंतु अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नसल्याने अर्धवट इमारत असल्याने ग्रामिण रुग्णालयात सुरु होण्यास विलंब होत आहे.
यासंदर्भात अनिल देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशात प्रश्न विचारला असता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ८ दिवसात कार्यवाही करतो असे सांगीतले. परंतु पाच महीने होवूनही काहीच न झाल्याने शेवटी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थीत केला. सभागृहात आश्वासन देवून जर पाच महिन्यात काहीच होत नसले तर काय करावे ? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थीत केला. यावर उत्तर देतांना सावंत लवकरच यावर कार्यवाही करणार असे परत आश्वासन दिले.