BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

Summary

मुंबई, दि. १२: अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भव्य कन्हवेन्शन सेंटर उभारण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. मंत्रालयात विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या […]

मुंबई, दि. १२: अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भव्य कन्हवेन्शन सेंटर उभारण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

मंत्रालयात विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, आमदार डॉ.बालाजी किणीकर उपस्थित होते.

मंत्री शिरसाट म्हणाले की, अनुसूचित जाती-जमातीमधील सफाई कामगारांच्या मुलांकरिता अंबरनाथ परिसरातील शाळेचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे. उल्हासनगर परिसरात १०० मुले व मुलींचे वसतीगृहाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच उल्हासनगर येथे संविधान भवन उभारण्याबाबत संबधित समाजकल्याण आयुक्त यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *