BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई रोजगार हेडलाइन

सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ स्थापन स्वतंत्र कक्ष व अधिकारी-कर्मचारी नियुक्त

Summary

मुंबई, दि. 5 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ हे स्वतंत्र कार्यासन निर्माण करण्यात आले असून, याबाबतचा कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नी दि. 01 जुलै रोजी झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र […]

मुंबई, दि. 5 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ हे स्वतंत्र कार्यासन निर्माण करण्यात आले असून, याबाबतचा कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नी दि. 01 जुलै रोजी झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते. या निर्देशांची अंमलबजावणी 5 दिवसातच पूर्ण झाली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयीन आदेशानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगासंबंधीची सर्व कामे व सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित अन्य सर्व बाबी या नवीन कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आल्या असून, या कार्यासनास कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपीक, टंकलेखक आदी पदांसाठी अधिकारी- कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हाताने मैला उचलणाऱ्या मृत सफाई कामगारांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीतली 21 प्रकरणे तातडीने निकाली निघावित, सफाई कर्मचाऱ्यांचा घरांचा अनुशेष भरून काढणे, वारसा हक्क कायदा, ठेकेदारी पद्धत बंद करणे यांसारखे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेला स्वतंत्र कक्ष पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *