सपाटीकरणाचे नावाखाली पर्यावरणाचा -हास काटोल- तालुक्यातील कोंढाळी भागातील घटणा वन-राजस्व-पोलीस विभागाकडे तक्रार
Summary
कोंढाळी-वार्ताहर काटोल तालुक्यातील कोंढाळी लगतच्या सोनेगाव–तरोडा मार्गावरील कोंढाळी पासून एक कि मी अंतरावरील खाजगी जागे चे सपाटीकरणाचे नावाखाली संरक्षित वन भूमी ला लागून असलेल्या जमीनीवर संबंधित भू-विकासकाकडून जमीन सपाटीकरणाचे नावाखाली लाखो रुपये किंमती चे मुरूमाचे नियमबाह्य उत्खननात सुरू असून या […]

कोंढाळी-वार्ताहर
काटोल तालुक्यातील कोंढाळी लगतच्या सोनेगाव–तरोडा मार्गावरील कोंढाळी पासून एक कि मी अंतरावरील खाजगी जागे चे सपाटीकरणाचे नावाखाली संरक्षित वन भूमी ला लागून असलेल्या जमीनीवर संबंधित भू-विकासकाकडून जमीन सपाटीकरणाचे नावाखाली लाखो रुपये किंमती चे मुरूमाचे नियमबाह्य उत्खननात सुरू असून या जागे वरील सागवान झाडांना इजा पोहचविण्याचे बाबद ची तक्रार राजस्व विभागाचे संबधित भागातील ग्राम अधिकारी ते जिल्हाधिकारी तसेच वन विभागाचे अधिकारी यांचे कडे समाज माध्यमाचे सहाय्याने करन्यात आली आहे.
कोंढाळी लगतच्या सोनेगाव,सालई, तरोडा, धुरखेडा,पांजरा, शिरमी भागातील अधिकांश शेतकर्यां नी आप आपली शेत जमिनी बांधकाम क्षेत्रातील भू विकासकांनी विकत घेउन ले आऊट टाकणे बाबद लागणारी नियमावली ला महत्व न देता शेतकर्यां कडुन खरेदी केलेल्या जागेत चूना मारून सर्रास भू खंडाचे विक्री करीता आकर्षक पत्रके छापून संबंधित जागेची ले आऊट मधे गणना करून भू खंडाची जोरात विक्री सुरू आहे.
*सपाटीकरणाचे नावाखाली खोदकाम*
ले आऊट पाडण्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून शासकीय सुटीचा व रविवार दिवसाच डाव साधत राजस्व खात्याकडून गौणखणिज विभागाकडून कुठल्याही परवानगी शिवाय व रायलटी न भरता मुरमाचे उत्खनन सुरू असते. 27नव्हेंम्बर रोज रविवार ला कोंढाळी -सोनेगाव तरोडा मार्गा लगत येथील भू-विकासकाकडून जमीनीचे सपाटीकरणाचे नावाखाली दहा दहा फुट खोलीकरण करत मुरम उत्खनन सुरू आहे. तसेच या भूखंडावर असलेले 30-30वर्षाचे सागवानी झाडांच्या चहूबाजूंनी मुळांवर ज सी बी ने घाव घालून मुळ्यांना तोडून ईजा पोहचवली आहे.
या प्रकरणी वन परिक्षेत्र कोंढाळी चे वन परिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांचे कडे तक्रार केली असता या तक्रारी ची दखल घेत कोंढाळी उपवन अधिकारी एफ बि पठाण व वन रक्षक वाय टी नपते यांनी घटनास्थळी पोहोचले व सागवानी वृक्षांना इजा पहचविन्या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
त्याच प्रमाणे राजस्व विभागा कडून नही चौकशी केल्या जाईल असे काटोल चेउप विभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर व तहसीलदार अजय चरडे तसेच नायब तहसीलदार राजेंद्र जंवजाळ यांनी कोंढाळी मंडळ अधिकारी साददकर यांना घटनास्थळी पोहचून चौकशी चे आदेश दिले, त्या नुकसान मंडळ अधिकारी साददकर यांनी मुरूम उत्खननाची चौकशी सुरू केली आहे.