BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

सदानंद देवगडे पत्रकार : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन चे संस्थापक अध्यक्ष,झुंजार कामगार नेते,विज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना सर्वप्रथम भत्ते लागू करून देणारे(भास्त्यांचे जनक) दिवंगत भाई बाबु भालाधरे यांचे

Summary

सदानंद देवगडे पत्रकार : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन चे संस्थापक अध्यक्ष,झुंजार कामगार नेते,विज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना सर्वप्रथम भत्ते लागू करून देणारे(भास्त्यांचे जनक) दिवंगत भाई बाबु भालाधरे यांचे कामगार चळवळीतील बहुआयामी योगदान …. विज […]

सदानंद देवगडे पत्रकार : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन चे संस्थापक अध्यक्ष,झुंजार कामगार नेते,विज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना सर्वप्रथम भत्ते लागू करून देणारे(भास्त्यांचे जनक) दिवंगत भाई बाबु भालाधरे यांचे कामगार चळवळीतील बहुआयामी योगदान ….
विज निर्मिती व विविधांगी क्षेत्रात,असंघटीत कामगारांना शासन प्रचलीत किमान वेतन व विज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांना भत्ते (अल्लाउन्सेस )इत्यादी सोई सुविधा शासनाने निर्गमीत केल्या असल्या तरी उपेक्षित कामगारांना ततस्म सुविधेपासुन वंचीत रहावे लागत होते.यास मूलत: अधिकारी वर्ग आणी कंत्राटदाराचे संगनमत हे कामगारांना गिळंकृत करणारे होते,कामगारांवर जहाल अन्याय करणारे होते.अशातच ऐकोणविसशे पंच्यान्नव ते ऐकोणविसशे अठ्यान्नवच्या सुमारास अधिकारी वर्ग आणी कंत्राटदाराच्या बेबंदशाहीला जबरदस्त हादरा देण्यास कामगाराचं धाडसी नेतृत्व उदयास आलं ज्यांच नांव भाई बाबु भालाधरे. कोराडी औष्णिक विज केंद्रात चतुर्थ श्रेणीत कार्यरत असतांना आपल्या अल्प वेतनातुन घरप्रपंच चालविणे व त्यातुनच जमेल तसे मुलांना शिक्षण शिकविणे ही वडीलांची अंतरीक मनीषा होती.अशातच भाई बाबु भालाधरे यांचे बारावी पर्यंत शिक्षण चालु असतांना आयटिया करुन कोराडी विज केंद्रात अप्रेंसिप केले व अप्रेंसिपला मार्क्सची टक्केवारी जादा असल्याने लगेच कोराडी विज केंद्रात नौकरी करिता अप्लाय केले होते नौकरीची संधी देखील असता ती त्यांनी नाकारली. अन्यायाची चिड असणार्या बाबुभाईंना शोषीत पिडीत कामगारांच्या व्यथा आणी वेदना स्वस्थ बसु देत नव्हत्या.त्यांनी ठाम निर्धार केला आणी लाँगमार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या राष्ट्रीय मजदुर सेना या संघटनेत कामगारांच्या हितासाठी अहोरात्र कामे करुन उपेक्षीत कामगारांना न्याय मीळवुन दिला. बाबुभाईंनी कालांतराने काही अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रीय मजदुर सेनेतुन बाहेर पडुन सन २००६ मध्ये महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदुर सेनेची स्थापना करुन अल्पावधीतच राज्यातील प्रत्येक थर्मल पावर स्टेशनला व इत्यादी कारखान्यात रोजंदारी मजदुर सेनेच्या शाखा स्थापीत केल्या त्या आजमितीला राज्यात अव्वलस्थानी आहेत.
बाबुभाईंनी कामगार हा केंद्रस्थानी ठेवुन कामगारांचे जीवनमान व उत्थान कसे होईल याकडे आपले तारुण्य व संपुर्ण हयात खर्ची घातली याचे बाबुभाईंचे सच्चे शिलेदार,व तमाम कामगार बांधव साक्षीदार आहेत.
कंत्राटी कामगार आपल्या जीवाची पर्वा न कर्ता विज उत्पादनाची भरभराट करुन देशाच्या राष्ट्रीय संपत्तीची वाढ करित आहे,देश समृद्ध करित आहे.मात्र कामगारांना आपल्या परिवाराचा गाडा चालविणे दुरापास्त होत आहे याचं शल्य व चाहुल बाबुभाईंना लागत होती.
कामगारांचं शोषण व पिळवणुक थांबविण्याकरिता बाबुभाईंनी शासन प्रशासन व विज प्रशासनांस आपल्या धारदार लेखणीतुन जागे केले.कामगारांच्या मुलभुत हक्क अधिकाराचं आपणाद्वारा व कंत्राटदारांकडुन हनन होत असेल तर महाराष्ट्रातील विज केंद्र बंद पाडु असा सज्जड इषारा बाबुभाईंनी शासन प्रशासन विज व्यवस्थापणास गर्भीत इषारा दिला.त्याप्रमाणे विविध विज केंद्राच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर ऐतीहासीक धरणे मोर्चा आंदोलने यशस्वी केलीत आणी खर्या अर्थाने कामगारांना न्याय मीळवुन दिला ही वास्तविकता आहे,सत्यता आहे. नागपुर विधानसभा हिवाळी अधिवेशनात अनेकानेक मोर्चे संपन्न करुन तमाम कामगारांना किमानवेतनासह विविध भत्त्यांचं परिपत्रक निर्गमीत करण्यास उर्जा विभाग व कामगार विभागांस भाग पाडले ही बाबुभाईंची धाडसीवृत्ती भल्याभल्यांना चकीत करणारी होती.आज बाबुभाई जरी हयातीत नसले तरी त्यांचे कामगारांप्रती जिव्हाळ्याचे ऋणानुबंध कायम असतील यात तीळमात्र शंका नाही हे प्रांजळपणे नमुद करावेसे वाटते.
बाबुभाईंचा कामगार चळवळीतील आलेख फारच व्यापक आहे तो शब्दबध करणे किंबहुना व्यक्त करणे हे शब्दापलीकडचे आहे.
त्यांची चिरस्मृती त्यांचे हित चिंतक,इष्टमीत्र,कामगार बांधव व तुम्हा – आम्हा समस्तांना निरंतर प्रेरणा व उर्जा देणारी,बळ देणारी ठरेल.
आज १७ एप्रील २०२५ बाबुभाईंचा जन्मदिवस,
त्यांच्या वाढदिवसा निमीत्त
त्यांच्या लढव्यया बाण्यास,व कार्यकर्तृत्वास … वंदन ….🙏🙏🙏 व शब्दरुपी आदरांजली …..
💐💐💐
– भाई सदानंद पि. देवगडे, जिल्हा अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य विज निर्मिती
रोजंदारी मजदुर सेना संलग्न न्यू ट्रेड युनियन इनिसिएटीव्ह, चंद्रपर मो. नं. 8055789377

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *