सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे बळकटीकरण होण्यासाठी तिन दिवशीय कार्यशाळा संपन्न
Summary
गडचिरोली,चंद्रपूर व नंदुरबार जिल्ह्यामध्ये सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचा विस्तार झालेला असून संस्थेला पाच वर्षे पूर्ण झालेले आहे त्या अनुषंगाने पुढील दहा वर्षांकरिता ध्येय धोरण निश्चिती तसेच कृती नियोजन करण्याच्या हेतूने कार्यशाळा नुकतीच नागभीड येथे पार पडली. सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था […]
गडचिरोली,चंद्रपूर व नंदुरबार जिल्ह्यामध्ये सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचा विस्तार झालेला असून संस्थेला पाच वर्षे पूर्ण झालेले आहे त्या अनुषंगाने पुढील दहा वर्षांकरिता ध्येय धोरण निश्चिती तसेच कृती नियोजन करण्याच्या हेतूने कार्यशाळा नुकतीच नागभीड येथे पार पडली. सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभीड ,अलर्ट इंडिया मुंबई, सासाकवा हेल्थ फौंडेशन जपान यांच्या संयुक्त सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे वेगवेगळ्या माध्यमातून बळकटीकरण व्हावे व संस्थेच्या सभासदांचे सक्षमीकरण व्हावे या अनुषंगाने कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेची गटचर्चेच्या माध्यमातून SWOT Analysis करण्यात आली, तसेच समाजामध्ये असलेल्या कुष्ठांतेयाच्या समस्या पुराव्याच्या अनुषंगाने पॅनल डिस्कशन करण्यात आले. प्रसार माध्यमाचा वापर व ऍडव्होक्सी संदर्भात सुध्दा कार्यशाळा घेण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी .के.ए.व्हीन्सट अलर्ट इंडीया मुंबई, प्रमुख मार्गदर्शक सुरेश धोंगडे NLEP समन्वय ,मंगला धोंगडे कार्यक्रम व्यवस्थापक दि लेप्रोसि मिशन कोठारा, रवी वानखेडे स्पर्श ऍड.अमरावती, तसेच या कार्यशाळेत सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभीड,अलर्ट इंडीया मुंबई , अवार्ड संस्था नागभीडचे पदाधिकारी उपस्थित होते.