संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
Summary
मुंबई, दि. २६ : संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त […]
मुंबई, दि. २६ : संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील,महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे उपस्थित होते.
भारतीय संविधानाच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत ‘घर घर संविधान’ या उपक्रमांतर्गत संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्य असलेल्या बी.आय.टी. चाळ येथे झालेल्या अभिवादन कार्यक्रमाने संविधान दिनाचा आरंभ झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारित चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून मुंबई शहर व उपनगरातील समाजभूषण पुरस्कारप्राप्त नामवंतांना संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सिद्धिविनायक मंदिर, दादर ते चैत्यभूमी या दरम्यान संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.
0000
