BREAKING NEWS:
नागपुर पर्यावरण महाराष्ट्र हेडलाइन

संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घेतले वृक्ष दत्तक

Summary

{‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी लाखोटीया ‌भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष संगोपन व संवर्धन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संस्कृती निर्माण करण्यासाठी […]

{‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी लाखोटीया ‌भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे
यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष संगोपन व संवर्धन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागानेच वृक्ष लागवड व संवर्धन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्राचार्य व उपमुख्याध्यापक व शिक्षकांनी वृक्ष दत्तक दिले.}

८५ विद्यार्थ्यांचा सहभाग : कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम, लाखोटीया ‌भुतडा हायस्कूल व कनिष्ठमहाविद्यालयाचे वृक्षारोपण

कोंढाळी -वार्ताहर-दुर्गाप्रसाद पांडे
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी तसेच मेरी माटी-मेरा देश ची संकल्पना च्या माध्यमातून येथील लाखोटीया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यमाने हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचे माध्यमातून व्यवस्थापक मंडळ अध्यक्ष राजेश विद्यार्थी वृक्ष दत्तक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.यातून वृक्ष संगोपन व संवर्धन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागानेच वृक्ष लागवड व संवर्धन हा कार्यक्रम घेण्यात आला. यात प्रत्येक वर्गाला एका रोपट्याचे संगोपन करून ते मोठे झाड होईपर्यंत यांचे वर्गावार संगोपन करण्याचा निर्धार वृक्ष दत्तक विद्यार्थ्यांनी केलाआहे.अशी माहिती प्राचार्य सुधीर बुटे यांनी दिली आहे.विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेल्या रोपट्याचे (वृक्षांचे) सुरक्षा संवर्धन या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाडचे सुरक्षे साठी जाळींचे कुंपन घालण्यात आले आहे. विद्यार्थी दत्तक वृक्षला क्रमांक दिला असून तो क्रमांक विद्यार्थी व वर्ग क्रमांक असल्याने संबंधीत वर्गाचा विद्यार्थींची देखभाल असणार आहे. हि वृक्षलागवड विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातच केलीआहे.या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी त्या-त्या विद्यार्थ्यांवर असणार आहे. वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा प्राचार्य नियमित घेणार आहेत. वृक्षाची निगा व संवर्धन करण्याऱ्या विद्यार्थ्यांस पुढील वर्षी पारितोषिक देण्यात येणार आहे. मानवाला जीवंत राहण्यासाठी प्राणवायुची गरज आहे. प्राण वायु देण्याचे काम वृक्ष करतात. वसुंधरेने तयार केलेल्या संसाधनाचा मानव वापर करीत असला तरी प्राणवायु निर्माण करण्यासाठी लागणारे वृक्ष लावण्याचे काम मात्र होत नाही. वृक्ष दत्तक मोहिमेत वृक्ष लावा व वसुंधरेला जगवा असे संस्कार विद्यार्थ्यांवर करण्याचा उद्देश आहे. या मोहिमेत महात्मा गांधी विद्यालयातील ८५ विद्यार्थी व शिक्षकांनी स्वयंस्फूर्तेने सहभाग घेतला.
कनिष्ठ महाविद्यालयाचे. प्राचार्य यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदणे, वृक्ष व इतर साहित्य शाळा व्यवस्थापनाने
उपलब्ध करुन दिले. शिक्षकांच्या सहयोगातून वृक्षारोपणाचे संवर्धन कुपन पुरविण्यात आले.विद्यार्थी संस्कारक्षम असतात त्यांच्यावर वृक्ष संवर्धनाचे संस्कार बालवयात केल्यास भविष्यात ते पर्यावरणाचे दूत म्हणून काम करतील या उद्देशाने विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आजच जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर ऑक्सीजनचा सिलेंडर सोबत घेवून फिरण्याची मानवावर वेळ येईल. हा धोका टाळण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लावावे म्हणून प्रशासनाने पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक दिले आहे. झाडाची वाढ व निगा राखण्याकरिता विविध उपाय योजना करीत आहे. रक्षाबंधन निमित्य रक्षक व सहकारी चमू प्रत्येक दत्तक वृक्षाला राखी बांधणार असून बांधिलकी जपणार असल्याचे वृक्षरोपान व संवर्धन समितीने सांगितले. या झाडाला पाणी देण्यासाठी प्लास्टिक बॉटलचा वापर करण्यात येणार आहे. या बॉटल झाडासोबत विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. कमीत कमी पाण्यात वृक्ष संगोपन व संवर्धन हा या मागचा उद्देश आहे. वृक्ष संगोपन करण्याऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षिसही देण्यात येणार आहे. याप्रसंगी उपमुख्याध्यापक कैलास थुल, ज्येष्ठ पर्यवेक्षक मनोज ढाले, पर्यवेक्षक हरीश राठी, वृक्षारोपण समिती प्रमुख प्रमोद इंगुलवार, संयोजक प्रा अनंत बुराण, हरित सेनेचे श्याम धिरण, ज्ञानेश्वर भक्ते, राखी प्रायोजक जेष्ठ शिक्षक सुनील सोलव, नायक यादव पंधराम, शुभम राऊत,प्रकाश मलवे आदी सह कनिष्ठ महाविद्यालय वृक्ष संवर्धन समिती उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *