पुणे महाराष्ट्र हेडलाइन

संमोहनाद्वारे बालकांच्या सुप्त शक्तींचा अविष्कार :- डॉ जगदिश राठोड

Summary

पुणे – नुकतेच पुलगाव येथील नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे संमोहनाद्वारे बालदिना निमित्य बालकांच्या सुप्त शक्तीचा आविष्कार करण्याकरिता संमोहन तज्ञ डॉ जगदिश राठोड यांचे संमोहन स्टेज शो कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमातून बालकांच्या विविध सुप्त कला […]

पुणे – नुकतेच पुलगाव येथील नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे संमोहनाद्वारे बालदिना निमित्य बालकांच्या सुप्त शक्तीचा आविष्कार करण्याकरिता संमोहन तज्ञ डॉ जगदिश राठोड यांचे संमोहन स्टेज शो कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमातून बालकांच्या विविध सुप्त कला गुणांचा प्रदर्शन झाले.

सविस्तर वृत्त असे की बाल दिनानिमित्त नेताजी सुभाष चंद्र बोस हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज येथे संमोहनतज्ञ डॉ जगदीश राठोड यांनी विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व विकास,एकाग्रता, अभ्यासात मन लावणे,अभ्यासाची गोडी निर्माण करणे, तसेच दैनंदिन जीवनातील ताण-तणाव, टेन्शन दूर करून सुखी व समृद्ध जीवन कसे जगावे याकरिता संमोहन स्टेजच्या मार्फत भरपूर मनोरंजन व प्रबोधन करणारे असे कार्यक्रम घेतले या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अंतर्मनाचे दालन कसे उघडे केल्या जाते व त्यामुळे त्यांच्यातील दुःख, वेदना ,तान , चिंता ह्या सगळ्या गोष्टी दूर केल्या जाऊ शकतात व पूर्ण शारीरिक मानसिक शक्ती एकत्रित करून अभ्यासात किंवा आपल्या कार्यात मन लावला जाऊ शकते. यावर भर दिले व अत्यंत चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य कसे साकारावे. याबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी या महाविद्यालयाचे प्राचार्य अमर शिरसागर सर तसेच उपप्राचार्य विकास तीरखुडे सर हे व त्यासोबतच प्रसिद्ध गायिका वर्षा पाटील या व्यासपीठावर स्थानापण होत्या या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात असलेले अभ्यासाशी संबंधित व आरोग्याशी संबंधित त्याविषयी प्रश्न उत्तराचा तास झाला व प्रश्न उत्तराच्या माध्यमाने सुद्धा विद्यार्थ्यांचे समस्याचे निवारण करण्यात आले.

या कार्यक्रमात सूत्रसंचालन श्री सोमनाथ अवसर तर या कार्यक्रमाचे संयोजक आभार श्री भारत पवार यानी मनले व शिक्षिका कु शुभांगी चव्हाण यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले व या ठिकाणी या कार्यक्रमातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मिल्ट्री स्कूलचे प्राध्यापक व विद्यार्थी बंधू भगिनीनी उपस्थित राहुन कार्यशाळेचा भरपूर लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *