अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विकासकामांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Summary

अमरावती, दि. 3 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र विभागाच्या इमारत विकासकामांचे लोकार्पण आज झाले. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार किरण सरनाईक, […]

अमरावती, दि. 3 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र विभागाच्या इमारत विकासकामांचे लोकार्पण आज झाले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार किरण सरनाईक, प्र-कुलगुरू प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव तुषार देशमुख यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगेबाबा संदेश शिल्प येथे भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रीय उच्चतर अभियानांतर्गत आदिवासी विकास केंद्राकरिता मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमीपूजन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. सूक्ष्मजीवशास्त्र, भूगर्भशास्त्र  विभागाच्या विविध स्थापत्य कामांचे भूमीपूजन व लोकार्पण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी त्यांनी केली.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *