बुलडाणा महाराष्ट्र हेडलाइन

संत गजानन महाराज यांना अपेक्षित असलेले गोर गरिबांचे कल्याण व सेवा करणारा सेवेकरी निर्वतला – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे शिवशंकर भाऊंना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

Summary

बुलडाणा, (जिमाका) दि. ४: शेगाव संस्थानचे प्रमुख आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज 4 ऑगस्ट रोजी     सायंकाळी 5:30 वाजता अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.अतिशय दुःखद व वेदनादायी अशी ही बातमी आहे. आदरणीय शिवशंकर भाऊंनी संत गजानन महाराजांचे कार्य जगभर पोहचविले. मागील […]

बुलडाणा, (जिमाका) दि. ४: शेगाव संस्थानचे प्रमुख आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज 4 ऑगस्ट रोजी     सायंकाळी 5:30 वाजता अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.अतिशय दुःखद व वेदनादायी अशी ही बातमी आहे. आदरणीय शिवशंकर भाऊंनी संत गजानन महाराजांचे कार्य जगभर पोहचविले. मागील अनेक वर्षांपासून संस्थानच्या माध्यमातून महाराष्ट्रात व मध्यप्रदेश मध्ये महाराजांचे मंदिर उभारणीचे काम त्यांनी केले. संत गजानन महाराज यांना अपेक्षित असलेले गोर गरिबांचे कल्याण व सेवा करण्याचे काम भाऊंनी आयुष्यभर अतिशय प्रामाणिकपणे केले. असा हा सेवेकरी आज आपल्यामधून निर्वातला आहे, अशा शब्दात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी शिवशंकर भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली.
  ते पुढे म्हणाले, त्यांनी संस्थानचे काम अतिशय पारदर्शक व  स्वछ ठेवले. संस्थानच्या माध्यमातून अनेक शाळा व उच्चशिक्षण संस्था निर्माण केल्यात. आनंद सागर सारखे भव्य दिव्य पर्यटन स्थळ निर्माण केले.  प्रामाणिकपणे व सचोटीने प्रत्येक पैशाचा हिशोब भाऊंनी ठेवला. जेव्हा जेव्हा काही नैसर्गिक संकटं आली त्यावेळी संस्थांनच्या माध्यमातून भाऊंनी तात्काळ मदत केली. कोरोना काळात देखील जिल्ह्याला मोठा आधार संस्थानच्या माध्यमातून मिळाला आहे.
आदरणीय शरदचंद्र पवार  यांच्या सोबत त्यांचे शेवटपर्यंत ऋणानुबंध होते. आज शेगावला जो दर्जा प्राप्त झाला आहे त्याचे संपूर्ण श्रेय आदरणीय भाऊंना जाते. त्यांच्या जाण्याने खरे गजानन भक्त हरवले आहेत, असेही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *