BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

संत्रा व मोसंबी फळगळतीवर तात्काळ उपाययोजना करा – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

Summary

नागपूर, दि. 23:  काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादकांना मागील वर्षापासून दोन्ही बहारांमधील फळगळतीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे चर्चासत्र घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार […]

नागपूर, दि. 23:  काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी उत्पादकांना मागील वर्षापासून दोन्ही बहारांमधील फळगळतीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे चर्चासत्र घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जि.प. च्या अध्यक्षा रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, कृषी विभागाचे सहसंचालक रवींद्र भोसले, प्रगतीशिल शेतकरी दिनेश ठाकरे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

संत्रा व मोसंबीच्या फळबागांवर बुरशीजन्य किटकांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे निर्दशानास आले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत करण्यात येणार असल्याचे श्री. केदार म्हणाले. संत्रा व मोसंबीवरील रोगावरील निष्कर्षासाठी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करुन उपाययोजनांबाबत अहवाल सादर करावा आणि संत्रा व मोसंबी उत्पादकांचे प्रश्न सोडवावेत. कृषी विभागाने तात्काळ रोगावरील औषध उपलब्ध करुन द्यावे व किटकनाशक फवारणी करावी, अशा  सूचना त्यांनी केल्या.

अतिवृष्टीने गरीब शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्यामुळे त्या नामशेष झाल्या आहेत. शासनाने मदतीचा हात म्हणून अहवाल तयार करुन एमआरईजीएस मधून शेतकऱ्यांना विहिरी बांधून द्याव्यात. खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीबाबतचे प्रस्ताव 15 सप्टेंबरपर्यंत शासनाकडे पाठवावेत. प्रस्ताव पाठवण्याबाबत झालेल्या विलंबाबाबतची कारणमिमांसा त्यात नमूद करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गत अनेक वर्षापूर्वीचे नादुरुस्त तलाव दुरुस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. काटोल तालुक्यातील खामली येथील ग्रामपंचायत भवनाचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तयार करावा.  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ग्रामस्थांना मागील पूरपरिस्थितीमध्ये तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाचा आधार घेऊन लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. नाला खोलीकरण व बंधाऱ्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामास गती देवून लवकरात लवकर काम करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *