BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

संजय गांधी निराधार योजनेतील कोणताही लाभार्थीं वंचित राहू नये हेमंत कावडकर १ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी ‘अनलिंक ‘ २९-३०-३१जुलै पर्यंत ग्राम निहाय शिबिरां चे आयोजन

Summary

कोंढाळी दि. २९ : वारंवार सूचना व माहिती देऊन ही काटोल तालुक्यातील जवळपास एक हजार लाभार्थी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकले नाही. त्यामुळे पुढील तीन दिवस २९-३०-३१जुलै पर्यंत ग्राम पंचायत निहाय आधार लिंकिंग संबंधि शिबीर लाऊन गरजूंचे […]

कोंढाळी दि. २९ :
वारंवार सूचना व माहिती देऊन ही काटोल तालुक्यातील जवळपास एक हजार लाभार्थी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकले नाही. त्यामुळे पुढील तीन दिवस २९-३०-३१जुलै पर्यंत ग्राम पंचायत निहाय आधार लिंकिंग संबंधि शिबीर लाऊन गरजूंचे आधार लिंक करण्यात येणार आहे. ग्राम पंचायत निहाय लावले शिबीरात गरजू लाभार्थींनी आप आपले आधार लिंक करून घ्यावे . संजय गांधी निराधार योजनेतील तालुक्यातील प्रत्येक लाभार्थी ला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असे आवाहन काटोल तालुका संजय गांधी निराधारही योजना समिती चे अध्यक्ष हेमंत कावडकर यांनी २९जुलै रोजी रिधोरा ग्राम पंचायत येथील आयोजित शिबीरा दरम्यान आवाहन केले.
यासंदर्भात संजय गांधी निराधार योजना समिती चे नायब तहसीलदार भागवत पाटील यांनी या प्रसंगी सांगितले की आधार कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार शिबिरे घेण्यात आली.मात्र तरीही अनेक जण आधार कार्डला आपले बँक खाते जोडू शकलेले नाहीत. योजनेतील पारदर्शीतेसाठी व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आधार कार्ड सोबत बँकेचे खाते जोडले जाणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे अद्याप ही काटोल तालुक्यातील एक ही लाभार्थी वंचित राहू नये ,तसेच ज्या लाभार्थींचे अजुन ही आधार लिंक प्रामाणिकरासाठी होणे बाकी आहे ,या करिता शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतील विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी जसे की संजय गांधी निराधार,विधवा,‌दिव्यांग, योजना,श्रावणबाळ,इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना येतात. 65 वर्षाखालील निराधार लोकांना या योजनेतील लाभ प्रामुख्याने भेटतो. महाराष्‍ट्र शासन व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृत्‍तीवेतन योजना या योजनेमधील पात्र लाभार्थ्‍यांना बॅंक/पोस्‍ट खाते आधार क्रमांकाशी संलग्‍न केल्‍यानंतरच अर्थसाहाय्याचे वाटप करण्‍याबाबत शासन पत्रानुसार कळविण्‍यात आले आहे.
शिबीर घेतले तरी दुर्लक्ष
तहसिल या कार्यालयाने यापूर्वी अनेक वेळा आधार बॅंक खात्याशी सलंग्‍न करण्‍यासाठी कॅम्‍प आयोजित केला होते.
मात्र तरीही शिल्‍लक लाभार्थ्‍यानी अदयाप पर्यंत त्‍यांनी आपले खाते आधारशी संलग्‍न करून घेतले नसून कार्यालयात संबंधीत कागदपत्रे देखील जमा केलेली नाहीत .सबब ग्राम पंचायत निहाय पुढील तीन दिवसाच्‍या आत आपले बॅंक/पोस्‍ट खाते आधारशी संलग्‍न करून घेण्‍यात यावे. तसे न केल्‍यास आपले अनुदान वितरीत करता येणार नाही याची नोंद घ्‍यावी.
नागरिकांनी सहकार्य करावे
संजय गांधी व तत्सम योजनेतील लाभार्थी ६५ वर्षांपेक्षा कमी आणि कुटुंबाचे उत्पन्न प्रतिवर्षी रुपये २१,०००/- पर्यंत असणाऱ्या अत्यल्प आर्थिक गटातील बहुतेक निराधार असतात. यामध्ये प्रामुख्याने निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठी आजार,ंचा घटस्फोटीत स्त्रिया, दुर्लक्षित महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादी लाभार्थ्यांचा सहभाग असतो त्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांनी त्यांना यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही अध्यक्ष हेमंत कावडकर तसेच प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी तहसील कार्यालय काटोल येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार राजू रणवीर तसेच संजय गांधी निराधार योजना समिती चे नायब तहसीलदार भागवत पाटील यांनी केले आहे.
या शिबीरा प्रसंगी रिधोरा,पारडसिंगा, मुर्ती सह अनेक ग्राम पंचायती मधे ‌शिबीर घेण्यात आले. सरपंच शिबीरांना गरजु लाभार्थी तसेच सरपंच तसेच ग्राम पंचायतीचे सर्व पदाधिकारी,या प्रसंगी उपस्थित‌ होते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *