संचालक मंडळ व व्यवस्थापकाने केली २ कोटी ९५ लाख ५१ हजार ४२४ रुपयांची अफरातफर। दि एकात्मिक ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. कारधा येथील प्रकार। लेखापरीक्षणात उघड।

खमारी बुटी:- भंडारा तालुक्यातील दि एकात्मिक ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. कारधा या पतसंस्थेत केलेल्या दोन वर्षाच्या लेखापरीक्षणात संचालक मंडळ व व्यवस्थापक मंडळ यांनी सोनेतारण रक्कम मुदत ठेवताना व बनावट मुदत ठेव प्रमाणपत्र यामध्ये ०२ कोटी ९५ लक्ष ५१ हजार ४२४ रुपयांची अफारातफर केल्याचे उघडकीस आल्याने लेखापरीक्षक यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसात संचालक मंडळ व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दि एकात्मिक ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. कारधा या पतसंस्थेची सण २०१९ ते २०२१ पर्यंतच्या दोन वर्षाचे आर्थिक लेखापरीक्षण शासन प्रमाणित लेखापरीक्षक विनायक पुडके यांनी केले. केलेल्या लेखापरीक्षणात संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी संस्थेचे सोनेतारण रक्कम मुदत ठेवतारण व बनावट मुदत ठेव प्रमाणपत्र या मध्ये आपसी संगनमताने २ कोटी ९५ लक्ष ५१ हजार ४२४ रुपयांची अफरातफर करून अपहार केल्याचे उघडकीस आले. लेखापरीक्षक यांचे तक्रारीवरून कारधा पोलिसात धनराज टांगले रा. भिलेवाडा, मनोज दुरबुडे रा. भंडारा, आनंदराव निंबार्ते रा. भिलेवाडा, शिवशंकर बांते रा. भिलेवाडा, रामभाऊ निंबार्ते रा. भिलेवाडा, काशिनाथ बोंद्रे रा. कारधा, घनश्याम दुरबुडे रा. भंडारा, गौरीशंकर नेवारे रा. भिलेवाडा, अनुराधा निंबार्ते रा. भिलेवाडा, जना भुरे रा. कारधा, लिला गणवीर रा. भिलेवाडा व महेश दूरबुडे रा. भंडारा यांचे विरुद्ध कारधा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.