संघर्ष नव्हे,सहजीवन हवे वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते
कोंढाळी-वार्ताहर
पर्यावरणाचा समतोल ढासाळू नये, तसेच मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष होऊ नये. या करिता जंगल लगतचे शेतकरी व गावकर्यांनी सहकार्य करावे असे आवाहन कोंढाळी वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांनी बोर अभयारण्य लगतचे (बफरझोन)लगतचे कामठी व लगतचे गावांचे गावकरी व शेतकरी, गुराखी, तसेच शेतमजूरांना 08एप्रील रोजी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उपस्थितीतांना सांगितले की कोंढाळी वन परिक्षेत्र बोर अभयारण्याला लागून असल्याने या अभयारण्यातील वन्यजीव यांचा वावर आपल्या शेतावर किंवा गावात, गावांलगत नक्किच आवडनार नाही, किंवा जंगलात मानवी -जनावरे पाळीव प्राणी यांचा (वावर)हस्तक्षेप आवडनार नाही.
आपल्या परिसरात वाघ,बीबट, अस्वल, रोही,डुकरांचा संचार आहे. या करीता आपल्या शेतात, शेतशिवारत जातांना व परत येतांना ची काळजी घ्यावी, या करिता शेतावर जातांना काळजी घ्यावी, रात्र जागल व रात्री पाणी ओलीतासाठी जातांना दोन तिन व्यक्ती सोबत असावे सोबतच काठी, टॉर्च, जवळ बाळगायला हवे. सध्या मोबाईल सर्वांकडे असतोच तर शेतावर जातांना मोबाईल वर मोठ्या आवाजात गणी वाजवावी. उघड्यावर शौचास जाऊ नये. गुरे चारण्यासाठी जातांना गुराख्या़नी जनावराच्या गटांचे मागे पुढे उभे राहून गुरे चारावी.गुराखी किंवा शेतकऱ्यांनी काठीस जमिनीस समांतर खांद्यावर घेऊन चावावे. जंगल लगतचे शेतावर काम करतांना, तेंदूपत्ता किंवा मोहफुल वाचतांना ज्यात काळ वाकुन राहू नये, दोन तिन
व्यक्तींनी सोबत राहून काम करावे.जंगलात गल्यास वृक्ष तोड,वन्यजीव शिकार करू नये, शेतातील धूरे पेटवतांना जंगलाला आग लागनार नही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांनी दिली.
अशा प्रसंगी शिवारात, शेतात, गावालगत भरकटलेले वन्यजीवांना (हिंस्त्र प्राणी) सुखरूप वनात पाठविने वन विभाग व गावकर् यांकडून अपेक्षा व्यक्त करत असतांना वनपाल व एस आर सोनवणे, एफ बी पठाण, वन रक्षक आर एस लाखोडे,पि व्ही शिंदे,एम जी केंद्रे, वाय टी नप्ते,ए एन जाधव,एस डी वाघमारे, वैभव मेश्राम,किशोर कुसळकर,तसेच पुंडलिक सरोदे यांनी प्रात्यक्षिक ही करून दाखवले.