श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी अभियानाचा लाभ गैर बंजारा लमान तांडा वस्त्यांना बंजारा तांडा समृद्धी नीधीं चा नियमबाह्य उपयोग बंजारा समाज संघटनांकडून जि प प्रशासकिय अधिकारी यांचे कडे तक्रारी काटोल गटविकास अधिकार्यां कडून तालुक्यातील ५ बंजारा तांडा वरुन ३४ तांड्याची निर्मिती? संशोधनाचा विषय विभागीय चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याबाबत तांडा सुधार समितीची मागणी
कोंढाळी – वार्ताहर –
राज्याच्या उपराजधानी नागपूर मध्ये कधी काय घडेल काही सांगता येत नाही!.येथील काटोल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी काटोल पंचायत समिती अंतर्गत पाच बंजारा लमान तांडा वस्त्यां ऐवजी नियमबाह्य २९तांडा वस्त्यां दर्शवून त्या तांडा वस्त्यांना गाव क्रंमाक ही दर्शवून त्यावर कोट्यावधीं रूपयांचे बांधकाम ही केल्याची माहिती उजेडात आली आहे. जिल्ह्यातील नविन तांडा वस्ती गावांची निर्मितीसाठी लागणारे अशासकीय सदस्य ही काटोल तालुक्यातील ऐवजी आपल्या मर्जीतील शहरी भागातील नागरिकांना अशासकीय सदस्य नेमून बीगर बंजारा लमान नागरिकांचे वस्त्यांना बंजारा लमान तांडा समृद्धी अभियानाचा नीधी खर्च केल्याची सामोर आले आहे. हे काम २४फेब्रूवारी २०१४ चे शासन निर्णयानुसार केल्याचे सांगितले जाते. तालुक्यात अस्तित्वात असलेल्या ५ बंजारा तांडयांच्या जागेवर ३४ तांडयाची निर्मिती करून, नियमबाह्य कामे करण्याच्या उद्देशाने योजनेतील अशासकीय सदस्यांसोबत संगणमत करून तालुक्यातील मूळ तांड्यातील रहिवासी लोकांसोबत अन्याय प्रकार घडलेला असून या प्रकरणाची स्पष्ट चौकशी करून दोषी प्रशासनातील झेरीच्या शुक्राचार्यावर विभागीय चौकशी करून दोषींवर दंडात्मक कार्यवाहीची मागणी अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र जाधव यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री,ग्रामीण विकास पंचायतराज मंत्री,प्रधान सचिव ग्रामविकास,तसेच विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर यांना निवेदन देऊन विभागीय चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनानुसार काटोल तालुका अंतर्गत (१) पुसागोंदी,(२) वसंतनगर,(३) खापा, (४) माहुरखोरा, (५) गरमसुर,असे एकूण ५ बंजारा समाजाचे तांडे आहे, परंतु माहितीच्या अधिकार अंतर्गत पंचायत विभाग जिल्हा परिषद नागपूर कडून प्राप्त माहितीनुसार काटोल तालुक्यात बंजारा समाजाचे वरील पाच तांडाचा जागेवर , सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेतील अशासकीय सदस्यांच्या सोबत संगणमत करून गटविकास अधिकारी पंचायत समिती काटोल यांनी तालुक्यातील ५ तांडावरून ३४ तांडयाची बेकायदेशीर निर्मिती केली आहे.स्वतंत्राच्या ७८ वर्ष नंतरही विकासाच्या मूळ प्रवाहात वंचित बंजारा समाजाच्या तांड्याच्या विकासासाठी आणलेल्या महत्वाच्या योजनांमध्ये,जे तांडा अस्तित्वातच नाही,असे नव नवीन तांड्याची निर्मिती करुन भ्रष्टाचार करण्याच्या मोठा षडयंत्र केला जात आहे.असे आरोप धर्मेंद्र जाधव यांनी निवेदनात करत संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजना अंतर्गत अशासकीय सदस्यपदी स्थानिक जिल्ह्यातील मूळ तांड्यातील रहिवासी लोकांना डावलून,बाहेरील जिल्ह्यातील नोकरी करिता नागपूर महानगर शहरात रहिवासी असलेल्या लोकांना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
वारंवार निवेदन विनंती करूनही त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
तसेच बाहेरील जिल्ह्यातील असल्यामुळे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमधील चारही सदस्यांना जिल्हातील तांड्याची संख्या, त्यांच्या अडचणी, निकड याबद्दल सुतराम कल्पना नाही. व या चारही लोकांचे स्थानिक जिल्हातील कोणत्याही तांड्यामध्ये नाते संबंध सुद्धा नाही. नौकरी करिता बाहेरून आलेले नागपूर शहरात वास्तव असल्याने हे लोक शहरात येणाऱ्या भूभाग वस्तीना/नगर यांना सुद्धा बेकायदेशीर तांडा घोषित करत आहे व योजनेचा बेकायदेशीर लाभ घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फसल्या जात आहे.त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील लोकांची केलेल्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती रद्द करून मूळ जिल्ह्यातील तांड्याचे रहिवासी असलेल्या लोकांना या योजनेमध्ये अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती द्यावी.
महत्वाच्या योजनेमधील नियमबाह्यता रोखण्याकरिता जिल्हातील वर्तमान अशासकीय सदस्यांसोबत संगणमतमत करून मनमानी पद्धतीने तांडा निर्माण करणाऱ्या गटविकास अधिकारी पंचायत समिती काटोल यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात न आल्यास लोकशाही मार्गाने स्थानिक काटोल तांड्यातील नागरिकासह विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र जाधव बंडूभाऊ राठोड माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल ,ईश्वर जाधव, मांडवा, हरीश चव्हाण फुसांगोंदी, जगदीश चव्हाण वसंतनगर,लक्ष्मण मालोत मांडवा , रमेश चव्हाण उपसरपंच खापा , यशवंता पवार सरपंच गरमसूर, मोती राठोड, गरमसूर, प्रताप पवार, राजू राठोड संदीप चव्हाण यांनी फुसांगोंदी .गोविंदा पवार माहूरखोरा… यांनी केली आहे.
या बाबतीत काटोल पंचायत समिती चे विद्यमान गटविकास अधिकारी गुंजकर यांनी याबाबत सांगितले की सदर प्रकरण २०१४चे असुन त्या काळात बंजारा लमान तांडा वस्त्यां सोबतच भटक्या जमातीतील लोक वस्त्यांना क्रंमांक देऊन संबधीतीत वस्त्यांमध्ये बांधकाम केले आहे.