हेडलाइन

श्री संत जगनाडे महाराज रथयात्रेचे कांद्री-कन्हान शहरात भव्य स्वागत

Summary

श्री संत जगनाडे महाराज रथयात्रेचे कांद्री-कन्हान शहरात भव्य स्वागत   श्री संत जगनाडे महाराज रथयात्रेच्या स्वागताने कन्हान-कांद्री शहर दुमदुमले…   कन्हान : – श्री संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थल चाकण व समाधी स्थल सदुंबरे पुणे येथुन निघालेली रथयात्रेचे आगमन कांद्री-कन्हान […]

श्री संत जगनाडे महाराज रथयात्रेचे कांद्री-कन्हान शहरात भव्य स्वागत

 

श्री संत जगनाडे महाराज रथयात्रेच्या स्वागताने कन्हान-कांद्री शहर दुमदुमले…

 

कन्हान : – श्री संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थल चाकण व समाधी स्थल सदुंबरे पुणे येथुन निघालेली रथयात्रेचे आगमन कांद्री-कन्हान शहरात होताच संता जी सभागृह येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कांद्रीच्या वतीने फुलाच्या वर्षाव करून भव्य स्वागत करून चरण पादुकेचे दर्शनाचा लाभ घेण्यात आला.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महाराष्ट्र राज्य च्या वतीने जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पदशिष्ठ श्रीसंत संताजी महाराज यांचे अध्यामिक व ऐतिहासिक वारसा संपुर्ण महाराष्ट्रातील समाज बंधु भगीनीना परिचित व्हावा यास्तव श्रीसंत जगनाडे महा राज यांची रथयात्रा व पादुका दर्शन, समाज जोडो तसे च ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे बुधवार (दि .८) डिसेंबर ला श्रीसंत जगनाडे महाराजांचे जन्मस्थल चाकण येथुन समाधी स्थल सदुंबरे तालुका चाकण जिल्हा पुणे येथुन रथयात्रेचे शुभारंभ करण्यात आले असुन ही रथयात्रा संपुर्ण महाराष्ट्राचे भ्रमण करित मंगळवार (दि.२८) डिसेंबर ला सायंकाळी कन्हान-कांद्री शहरात आगमन होताच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कांद्री च्या वतीने संताजी सभागृह येथे फुला च्या वर्षाव करित जोरदार स्वागत करण्यात आले. तदं तर संताजी सभागृह मंदिरात श्रीसंत जगनाडे महाराज, श्री संत तुकाराम महाराज, रुक्मिणी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पुष्प अर्पित करित नमन कर ण्यात आले. आणि संताजी महाराजांचे पादुका व तुकाराम महाराज यांची गाथा समाज बांधवांच्या दर्श नार्थ ठेवण्यात आल्या. असता शेकडो समाजबांधवांनी दर्शन घेत संताजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रथयात्रेत सहभागी सर्व पाहुणांन्याचे स्वागत उपस्थित सर्व नागरिकांना अल्पोहार व बुंदी वितरण करून स्वागत कार्यक्रम थाटात संपन्न झाला. याप्रसंगी नागपुर जि प माजी उपाध्यक्ष शरद डोणेकर, कन्हान- पिपरी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, कांद्री ग्रा पं सरपंच बलवंत पडोळे, सदस्य शिवाजी चकोले, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा तालुका अध्यक्ष संकेत चकोले, तालुका कार्याध्यक्ष सुत्तम मस्के , कांद्री तेली समाज पंच कमेटीचे अध्यक्ष वामन देशमु ख, सहसचिव सौरभ डोणेकर, पत्रकार सुनिल सरोदे, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष व पत्रकार ऋृषभ बावनकर, मंच सचिव हरीओम प्रकाश नारायण, कोषा ध्यक्ष महेश शेंडे, मार्गदर्शक भरत सावळे, राहुल वंजा री, विशाल भुते, जयराम मेहरकुळे, राजेश पोटभरे, सौरभ पोटभरे, श्याम मस्के, ईश्वर कांमडे सह समाज बांध व नागरिक बहु संख्येने उपस्तिथ होते.

संजय निंबाळकर

राज्य चिफ ब्युरो

पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *