श्री संताजी स्नेही मंडळ, ऊर्जानगर यांचा सौजन्याने कोटुंबिक स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला.

आज दिनांक ०३/०७/२०२२ रोजी उर्जानगर येथे श्री संताजी स्नेही मंडळ, ऊर्जानगर यांचा सौजन्याने कोटुंबिक स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला. यात प्रामुख्याने श्री. चौधरी सर, अधीक्षक अभियंता हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले, त्याच प्रमाणे उपाध्यक्ष श्री. भट सर लाभले. प्रमुख वक्ता श्री. विजय अमृतकर सर, पत्रकार. प्रमुख अतिथी सौ. चंदाताई प्रदिप इटनकर, जिल्हाध्यक्ष, तैलिक महिला यलगार संघटना, चंद्रपूर.
कार्यक्रमा मध्ये विविध खेळांचा आयोजन करण्यात आले, त्याच बरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुध्दा करण्यात आला, कार्यक्रमाला उत्कृष्टरित्या पार पाडण्यात श्री संताजी स्नेही मंडळ, ऊर्जानगर चा सर्व पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा होता