महाराष्ट्र मुंबई राजकीय हेडलाइन

श्री. प्रशांत मानसिंग जाधव यांची “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)” नवीन पनवेल उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती

Summary

पनवेल | पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत मानसिंग जाधव यांची “शिवसेना नवीन पनवेल उपविभाग प्रमुख” म्हणून भव्य नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे […]

पनवेल | पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रशांत मानसिंग जाधव यांची “शिवसेना नवीन पनवेल उपविभाग प्रमुख” म्हणून भव्य नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे पनवेल विभागातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने श्री. जाधव यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा आणखी उंच फडकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

श्री. जाधव हे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर ठाम राहून शिवसेनेची परंपरा — जनसेवा आणि ताकद — जपतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पनवेल परिसरात पक्ष संघटन आणखी मजबूत होईल, असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

🎉 शिवसेना परिवाराकडून श्री. प्रशांत जाधव यांना हार्दिक शुभेच्छा! 🎉
“शिवसेना म्हणजे ताकद… शिवसेना म्हणजे जनसेवा!” ⚔️

✍️ राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक तथा डायरेक्टर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *