श्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धा पाळू नये – असू सक्सेना (कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न)
Summary
मौदा :- (प्रतिनिधी) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मौदा शाखेतर्फे विवेकी उपक्रमांतर्गत येथील रबडीवाला हॉटेलमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रद्धा अंधश्रद्धा व संघटना बांधणी या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका, कार्यकर्त्यांचे प्रकार, शाखेचे […]

मौदा :- (प्रतिनिधी) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मौदा शाखेतर्फे विवेकी उपक्रमांतर्गत येथील रबडीवाला हॉटेलमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रद्धा अंधश्रद्धा व संघटना बांधणी या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका, कार्यकर्त्यांचे प्रकार, शाखेचे प्रकार, कार्यकर्ता घडविण्याचे व टिकविण्याचे कौशल्य एकूणच संघटना बांधणी या विषयावर जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे यांनी संबोधित केले. तर श्रध्दा व अंधश्रद्धा यामधील फरक, कार्यकर्त्याची जडणघडण या विषयावर दक्षिण नागपूर शाखेच्या कार्याध्यक्षा आसू सक्सेना यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले. श्रद्धेच्या नावाने अंधश्रद्धा पाळू नयेत असेही सक्सेना म्हणाल्या.
प्रशिक्षण शिबिराची सुरुवात भारतीय संविधान प्रस्तावनेच्या वाचनाने करण्यात आली. या प्रशिक्षणाचा मौदा शाखेच्या अध्यक्षा अधिवक्ता कीर्तीमाला जयस्वाल, राम मस्के, मनोहर कापसे, दयालनाथ नानवटकर, डॉ. सिताराम राठोड, डॉ. राजेश पवार, डॉ. नीलिमा घाटोळे, डॉ. स्मृती खंते, राजू खवसकर, रेखा कोहाड, सुवर्णा खोपे, हरिचंद्र देशमुख, रमेश खोपे इत्यादी क्रियाशील पदाधिकाऱ्यांनी शिबिरामध्ये पूर्णवेळ सहभागी राहून कार्यरत राहण्याचा संकल्प जाहीर केला.
शिबिराचे सुत्रसंचालन शाखा कार्याध्यक्ष मनोहर कापसे यांनी केले तर आभार राम मस्के यांनी मानले
_________________________