शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 10.00 ते 20 लाखापर्यंत
Summary
गडचिरोली,(जिमाका)दि.24: सदर योजना बॅकेमार्फत राबविण्यात येते.इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा […]
गडचिरोली,(जिमाका)दि.24: सदर योजना बॅकेमार्फत राबविण्यात येते.इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी
अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावे. अर्जदार 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा. देशांतर्गत अभ्यासक्रम 1)आरोग्य विज्ञान, 2) अभियांत्रीकी, 3) व्यावसायीक व व्यवस्थापन, 4) कृषी , अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान परदेशी अभ्यासक्रम 1)आरोग्य विज्ञान, 2) अभियांत्रीकी, 3) व्यावसायीक व व्यवस्थापन, 4) विज्ञान 5) कला बॅकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके व साहीत्य खरेदीचा समावेश राहील परदेशी अभ्यासक्रमासाठी QS च्या रॅकींग 200 च्या आतील व GRE,TOEFL परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट दयावी तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय. मागे गडचिरोली येथे संपर्क साधावा. महाराष्ट्र् राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या (ओ.बी.सी.महामंडळ) थकीत कर्ज प्रकरणात लाभार्थ्यांसाठी एकरक्कमी परतफेड योजना (OTS) 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे.या योजनेनुसार महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणा-या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50% सवलत देण्यात येणार आहे.महामंडळाच्या गडचिरोली जिल्ह्यातील थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
******