नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

शेती कर्ज -नापीकी ला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या

Summary

कोंढाळी- येथून तिन किलोमीटर अंतरावरील पांजरा(काटे) या गावच्या ६३वर्षिय शेतकर्यांने सततची नापिकी, जंगली जनावरांमुळेपीकांचे नुकसान व मागील २०दिवसापासून नैसर्गिक कोणामुळे हतबल शेतकर्यांने शातातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोंढाळी लगतच्या पांजरा काटे या गावचे शेतकरी विद्याधर पांडूरंग […]

कोंढाळी-
येथून तिन किलोमीटर अंतरावरील पांजरा(काटे) या गावच्या ६३वर्षिय शेतकर्यांने सततची नापिकी, जंगली जनावरांमुळेपीकांचे नुकसान व मागील २०दिवसापासून नैसर्गिक कोणामुळे हतबल शेतकर्यांने शातातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोंढाळी लगतच्या पांजरा काटे या गावचे शेतकरी विद्याधर पांडूरंग सरोदे (६३)यांचे कडिल शेतीत मागील चार पाच वर्षापासून सतत ची नापीकी, शेत पीकासठी घेतलेले कर्ज व पीकाला जंगली जनावरांमुळेपीकांचे होनारे नुकसानीला कंटाळला होता. आपन आपल्या कुटुंबाला कसे पोसावे या विवंचनेत मागील चार पाच दिवसा पासुन विवंचनेत च होता. मी तुम्हाला कसे पोसू असे आपल्या पत्नी कडे विद्याधर बोलत असे, पत्नी रंजना बाई विद्याधर सरोदेला नेहमी धीर देत असे.विद्याधर 20मार्च ला सकाळी १०वाजता घरून शेतीवर जाऊन येतो असे सांगितले, दुपारी १२वाजे पर्यंत परत आला नाही म्हणून शोध घेतला असता शेतातील विहीरी लगत चपला होत्या. तेंव्हा विहीरत शोध घेतला असता विद्याधरला दुपारी दिड वाजता विहिरीतून मृत्यू अवस्थेत काढले.
या बाबद कोंढाळी पोलीस स्टेशन ला मृतकाचा मुलगा श्री कृष्ण सरोदे यांनी कोंढाळी पो स्टे ला तक्रारदिली. तक्रार मिळताच ठाणेदार पंकज वाघोडे आन डिवटि स्टाप सह पांजरा काटे घटणा स्थळी पोचले
मृतकाचा घटना स्थळ पंचनामा करून मृतकाचे शव विच्छेदनकाकरीता काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *