शेतक-यांना बीज प्रक्रिया बाबद प्रात्याक्षिका व्दारे मार्गदर्शन
Summary
कन्हान : – तेलंनखेडी गावात श्री शिवाजी कृषि महा विद्यालय, अमरावती अंतर्गत ७ वे सत्र कृषिदुत जयंत राधेश्याम हारोडे हयानी ग्रामिण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतक-याच्या शेतात प्रात्याक्षिका व्दारे बीज प्रक्रिया बाबद मार्गदर्शन करण्यात आले. पारशिवनी तालुक्यातील तेलंनखेडी गावातील शेतकरी लोमेश्वर […]
कन्हान : – तेलंनखेडी गावात श्री शिवाजी कृषि महा विद्यालय, अमरावती अंतर्गत ७ वे सत्र कृषिदुत जयंत राधेश्याम हारोडे हयानी ग्रामिण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतक-याच्या शेतात प्रात्याक्षिका व्दारे बीज प्रक्रिया बाबद मार्गदर्शन करण्यात आले.
पारशिवनी तालुक्यातील तेलंनखेडी गावातील शेतकरी लोमेश्वर परसरामजी गडे यांच्या शेतात डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ अकोला व्दारे श्री शिवाजी कृषि महाविद्यालय, अमरावती अंतर्गत ७ वे सत्र कृषिदुत जयंत राधेश्याम हारोडे हयानी ग्रामिण कृषी जनजागरण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतक-याच्या शेतात बीज प्रक्रिया चे महत्व आणि विविध प्रयोगाचे प्रात्याक्षिक करून दाखवुन या प्रक्रिया केल्या ने उत्पन्नात होणारी वाढ, किटका व्दारे पिकाची सुरक्षा तसेच ट्रायकोडर्मा व पीएसबी विषयी शेतकयांना मार्ग दर्शन करण्यात आले. याप्रसंगी लोमेश्वर परसरामजी गडे, बाबुलाल हिवसे, नरेंद्र खिळेकर, नरेंद्र गडे, धनिरा म मोहोड सह शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज
9579998535
