महाराष्ट्र हेडलाइन

शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज.

Summary

तीन लाखापर्यंतच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.याशिवाय कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना एक टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत चे पीक […]

तीन लाखापर्यंतच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.याशिवाय कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना एक टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत चे पीक कर्ज बिनव्याजी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती.त्या घोषणेची अमलबजावणी करण्याचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे पीककर्जात नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख पर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयासंदर्भात माहिती देताना राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की एक ते तीन लाखापर्यंत चे पीक कर्ज घेणाऱ्या आणि ते नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.यापूर्वी एक लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज भरावे लागत होते.राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.यंदा सरकारने 60 हजार कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट ठेवले आहे.

या निर्णयामुळे राज्य शासनाकडून मिळत असलेली व्याजदर सवलत तीन टक्के आणि केंद्र सरकारकडून मिळणारी तीन टक्के व्याज दर सवलत या दोन्ही चा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उलब्ध होणार आहे.असे त्यांनी सांगितले . डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत विहित मुदतीत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते.आता एक लाख ते तीन लाख रुपये या कर्ज मर्यादित शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास त्यांना अधिक दोन टक्के व्याज सवलत देण्याचा निर्णय मंत्री मंडळाने घेतला आहे.अशी माहिती त्यांनी दिली .कोरोनामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे इतर उद्योगाप्रमाने कृषी क्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला असल्याने आम्ही शेतकऱ्यांचा हितासाठी आणखी काही निर्णय लवकर घेणार आहोत.असे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे अनाथ बालकांना एक टक्का आरक्षण
कोरोनामुळे राज्यात अनेक लहान मुले अनाथ झालीआहे.त्याचा डोक्या वरील आई वडिलाचे छत्र हरवले आहे.अशा बालकाची काळजी सरकार घेणार आहे.या शिवाय सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात त्यांना एक टक्का आरक्षणही दिले जाणार आहे.हा महत्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *