शेतकरी सुखी झाला तरच देश समृद्ध होईल – कोंढळी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करू सभापती- चरणसिंग ठाकूर
काटोल/प्रतिनिधी
सिमेवर सुरक्षा करणारे जवान व या देशाचा शेतकरी हेच या देशाला तारू शकतात .
हे तारले गेले तरच देश तारला जाईल.
शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठीच केंद्र व राज्य सरकार सह सहकार चळवळी चे माध्यमातून (कृषी उत्पन्न बाजार समिती चे माध्यमातून)आमचा प्रयत्न असून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातूनच आमचे कार्य सुरू आहे .
*देशातला प्रत्येक शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे मूठभर लोकांची संपत्ती वाढली तर तो देश सधन होत नाही…*
देशातला प्रत्येक शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे. मूठभर लोकांची संपत्ती वाढली तर तो देश सधन होत नाही. शेतकरी समृद्ध झाला तर देश महासत्ता होतो, असे प्रतिपादन काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती चरणसिंह ठाकूर काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप कृषी उत्पन्न बाजार समिती कोंढाळी च्या परिसराची पाहणी दरम्यान कोंढाळी भागातील उपस्थित शेतकऱ्यांचे समक्ष मार्गदर्शन केले.या प्रसंगी चरणसिंह ठाकूर म्हणाले, की मी स्वतः शेतकरी आहे. शेती करणारा समाज एक कुटुंब आहे. शेतकरी समृद्ध असावा या करिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य सरकार चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध योजना राबवित आहेत. मात्र काही ठिकाणी शेतकरी आत्महत्यांबाबत दुखद घटना समोर येतात. हे काळजी करण्याचे कारण आहे. त्यावर नियंत्रण आणन्यासाठी ग्रामीण क्षेत्रात भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी गंभीरते झटत आहेत.
शेती तर,सिंधू संस्कृतीपासून शेतीत प्रयोग केले जात होते. वैदिक वाङ्मयात बळीराजाचे वर्णन आहे. यात अत्यंत समृद्ध शेतीचे वर्णन केले आहे. त्या बळीराजाची परंपरा आज आपण जपत आहोत. आज त्या बळीराजाच्या वारसदारांचे हाल होत आहेत. त्याच्या कष्टाची फळे त्याला मिळाली पाहिजे यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र शेतकरी अजूनही सक्षम झाला नाही , ही आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे. वस्तू वापरावी आणि फेकून द्यावी, तशी शेतकऱ्याची अवस्था होऊ नये यासाठी केंद्र , राज्य सरकार व काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही शेतकऱ्यांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहू. असे ही काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती चरणसिंग ठाकूर यांनी उपस्थित शेतकरी व पदाधिकार्यांना सांगितले.
या प्रसंगी उपसभापती झळके, किशोर गाढवे, देविदास कठाणे, शामराव तायवाडे, ही उपस्थित होते. काटोल नरखेड तालुका कौन्सिल फॉर ह्युमन राईटस् व भा ज प युवा चे बब्लु भिसे व यांनी सभापती ठाकूर यांना कोंढाळी कृषी उत्पन्न उप बाजार समिती नियमीत सुरू करून कोंढाळी व लगतच्या शेतकऱ्यांचे शेतमाल खरेदी सुरू करण्याची मागणी केली. व म्हणाले की केंद्र व राज्य सरकार कडून शेतकर्यांना विविध योजनांचे माध्यमातून विकसित केले जात.आहे तर दुसरी कडे शेतकरी आत्महत्या करत आहेत.शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी करायचे असेल तर तालुका उप तालुक्यातील बाजार समीत्या पुनर्जिवीत करणे गरजेचे आहे..