शेतकरी वानखेडे च्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहा यता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी तहसिलदार मा सहारे यांच्या मार्फत कन्हान शहर विकास मंच चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

कन्हान : – शहरात व परिसरात आलेल्या अवकाळी वादळ, वारा, पाऊस आल्याने खंडाळा (निलज) गावा ला लागुन असलेल्या गोठयात विज पडुन शेतकरी शंकरराव वानखेडे यांच्या एका बैलाचा मृत्यु झाला. ऐन शेतीचा कामाच्या वेळी भंयकर नुकसान झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिका-यांनी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात तहसिलदा र वरुणकुमार सहारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.श्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठवुन तात्काळ मुख्य मंत्री सहायता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.
मंगळवार (दि.१८) मे २०२१ ला कन्हान शहरात व परिसरात अचानक आलेल्या चक्रीवादळासह अव काळी वादळ, वारा, पाऊस आल्याने खंडाळा (निलज ) येथील शेतकरी शंकरराव महादेव वानखेडे यांच्या गावाला लागुन असलेल्या गोठयावर विज पडुन गोठ यात बांधुन असलेल्या एका बैलाचा मुत्यु झाला. ऐन शेतीच्या कामा सामोर अवकाळी पाऊसासह विज पडुन एका बैलाचा मृत्यु झाल्याने जवळपास ४०हजार रूपयाचे नुकसान झाले. अगोदरच संपुर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात तालुक्यात व शहरात कोरोनाचे चांगलेच थैमानाने व शासना द्वारे संचारबंदी आणि लाॅकडाऊन लावण्यात आल्याने शेतक-यांचे कामधंदे सर्व बंद पडले आहे. अश्यातच शेतकरी शंकरराव वानखेडे च्या गोठयावर विज पडुन एका बैलाचा मृत्यु झाल्याने दुसरा बैल विकत घेतल्या शिवाय शेती काम होणार नाही तर कुंटुबांच्या उदनिर्वाह चा प्रश्न उभा ठाकल्याने कोरोना महामारी संकट काळात म्हणजेच शेतक-यावर “दुष्काळात तेरा महिना” सारखी परिस्थि ती निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधि का-यानी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर च्या नेतृत्वात तहसिलदार वरुणकुमार सहारे यांच्या मार्फत मुख्य मंत्री मा.श्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठवुन शेतकरी शंकरराव वानखेडे यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, शेतकरी शंकरराव वानखेडे, सदस्य शाहरुख खान आदी मंच पदाधिकारी उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535