शेकापूर येथे 03 व 04 मे रोजी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव

कोंढाळी-
काटोल तालुक्यातील शेकापुर येथील झेंडा चौक मैदानावर 03 व 04मे 2025 रोजी दोन दिवसीय भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती आणि भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचा संयुक्त सोहळा साजरा होणार आहे.आकर्षक आतषबाजी आणि नामवंत व्याख्याते व कलाकारांचे सादरीकरण या सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जन्मोत्सव 2025 आणि भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाचा संयुक्त दैदिप्यमान सोहळा नागपूर जिल्ह्यातील काटोल काटोल तालुक्याच्या गट ग्राम पंचायत गणेशपुर-शेकापूर यांचे संयुक्त विद्यमाने शेकापूर येथील झेंडा चौक मैदानात पार पडणार आहे. येत्या शनिवार दिनांक 03 मे सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, व प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच 04मे रोजी पुरस्कार वितरण व प्रबोधनात्मक व्याख्यान व गीत गायनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव समिती २०२५ गट ग्राम पंचायत गणेशपूर -शेकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात आकर्षक आतषबाजी केली जाणार आहे. हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.
या प्रसंगी रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, मनोरंजनात्मक सांस्कृतिक व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
या सोहळ्यात समाज प्रबोधनात्मक व्याख्यान डॉ अश्विनी कुमार मेश्राम नागपूर तसेच समाज प्रबोधन गीतांचा कार्यक्रम हेमंत शेंडे व संच चंद्रपूर या प्रसंगी या कलाकारांच्या गायनाचा आणि उच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपस्थितांना आनंद घेता येणार आहे.
चार मे रोजी काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरणसिंग ठाकूर यांचे शुभहस्ते गणेशपूर -शेकापूर गट ग्राम पंचायतीच्या सरपंच संजीवनी राजेश मडके यांच्या अध्यक्षतेखाली , तसेच काटोल तालुक्यातील ज्येष्ठ नेते शेषराव चाफले,नानाजी माळवी, नरेंद्र डोंगरे, अर्चना ताई खोब्रागडे, राजकुमार त्रिपाठी, निशिकांत कापगते,निर्गुशाजी ठमके, डॉ अश्विन कुमार मेश्राम, नासीर शेख,तथा सत्य प्रकाश शर्मा यांचे प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यकर्ता राजेश मडके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या आयोजनाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच संजीवनी राजेश मडके, उप सरपंच अशोकराव भोयर, ग्राम पंचायत सदस्य -सुनिताताई वैद्य,दिव्याताई कोकोडे, मिनाताई कोकोडे, बारसीताई कोवे, दिनेश कौरती, व योगीता ताई परतेती तसेच ग्राम विकास अधिकारी शामकांत खवसे आणि पूजा वाटकर यांच्या सोबतच या कार्यक्रमाचे समन्वयक राजेश मडके यांनी या पंचक्रोशीतील नागरिकांना सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.