शिवसैनिकांना मातोश्री च्या आदेशाची वाट… काळ “कसोटीचा” आहे…

प्रेस नोट:-
शिवसैनिकांना मातोश्री च्या आदेशाची वाट… काळ “कसोटीचा” आहे…
पण काळाला सांगा हा वारसा “संघर्षाचा” आहे… शिवसेना पक्षावर आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी शिवसैनिक कायमच कटिबद्ध असतो. सोशल मीडिया किंवा इतरत्र चर्चा करतांना शिवसैनिक बांधवांनी संयम ठेवावा असे आवाहन महानगर प्रमुख किशोरजी कुमेरिया यांनी आज दि 21 जून 2022 रोजी शिवसेना भवन रेशीमबाग येथे सायंकाळी 4 वाजेपासून कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. करिता सर्वांना एकत्रित बसवून पक्षश्रेष्ठीं जो आदेश देतील तसेच ज्या प्रकारचे दिशानिर्देश सुचवतील त्या अनुषंगाने शिवसैनिक एकत्र मिळून मिसळून कार्य करतील. आपण सर्व शिवसेना पक्ष व प्रमुखांशी बांधील आहोत असे उपस्थित यावेळी आपले मत व्यक्त केले. यावेळी शहरप्रमुख प्रवीण बरडे, विक्रम राठोड, राजेश कनोजिया,अजय दलाल, अंकुश कडू, हरिभाऊ बानाईत, महेंद्र कठाणे, सुनील बॅनर्जी, मनोज शाहू, नरेंद्र मगरे, आनंद हरडे, किसन प्रजापति, प्रदीप तुपकर, सतीश कुडे, समीत कपाटे, स्वीटी सहगल, विक्की साबळे, राजू शिर्के, राजेश बांडबूचे, पंकज चानोरे, बबलू दरोडे, निलेश सतीबावणे, आशिष डोरले, मनोज कुमेरिया, संजोग राठोड, ढोके, राजेश रुईकर, शंकर बेलखोडे, राजेश गुजर व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. आपला नम्र:- किशोर कुमेरिया, महानगर प्रमुख, शिवसेना नागपूर.