BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

शिवसेना नेते आमदार श्री.आदित्यजी ठाकरे व कर्मचारी सेना युनियनच्या प्रयत्नांना यश

Summary

शिवसेना नेते आमदार श्री.आदित्यजी ठाकरे व कर्मचारी सेना युनियनच्या प्रयत्नांना यश बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट अखेर रद्द करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध […]

शिवसेना नेते आमदार श्री.आदित्यजी ठाकरे व कर्मचारी सेना युनियनच्या प्रयत्नांना यश
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट अखेर रद्द करण्यात आली आहे.
सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार असल्याचे पालिकेतर्फे प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आली होती. तथापि, त्यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची मागणी करणारे पत्र शिवसेना नेते आमदार श्री.आदित्यजी ठाकरे यांनी पालिका आयुक्त श्री.भूषण गगराणी यांना दिले होते. याच पार्श्वभूमिवर “म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने” चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे – बापेरकर यांच्याकडुनही वरील मागणी करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, ‘कार्यकारी सहायक’ पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल. जाहिरात प्रसिद्ध होवून येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *