शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये ‘एवढ्या’ जागांवर निवडणूक लढणार…

राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेने पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पण जागांबाबत अजूनही संभ्रम आहे. एकीकडे शिवसेनेच्या उत्तर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष यूपीमध्ये 403 जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर दुसरीकडे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले की, पक्ष फक्त 100 जागांवर निवडणूक लढवेल .
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आम्ही जवळपास 100 जागा लढवू शकतो. आणि गोव्यात आम्ही 20 पेक्षा जास्त जागा लढवू शकतो ज्यासाठी तयारी चालू आहे.
शनिवारी पक्षाने 403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
उत्तर प्रदेश शिवसेना प्रमुख ठाकूर सिंह यांनी शनिवारी म्हटले होते की, उत्तर प्रदेशातील विद्यमान राज्य सरकार ब्राह्मणांशी चांगले वागत नाही आणि महागाई आणि बेरोजगारी त्यांच्या शिखरावर आहे. अशा परिस्थितीत पक्षाने उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर