शिक्षणाधिकारी जि. प. नागपूर व राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे अनुषंगाने जिल्हास्तरिय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन
Summary
खापरखेडा: शिक्षणाधिकारी जि. प. नागपूर व राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे अनुषंगाने जिल्हास्तरिय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन 2024-25 आयोजनासाठी तालुकास्तरीय प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी पं. स. सावनेर यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले. दि 15 […]
खापरखेडा: शिक्षणाधिकारी जि. प. नागपूर व राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे अनुषंगाने जिल्हास्तरिय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन 2024-25 आयोजनासाठी तालुकास्तरीय प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी पं. स. सावनेर यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले. दि 15 व 16 डिसेंबर-2024 ला दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भन्साळी बुनियादी विद्यामंदिर , भन्साळी( टाकळी) या शाळेत करण्यात आले. यात महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खापरखेडा येथील उच्च प्राथमिक गटातून “पावसाचे पाणी साठवण व वापर” हा प्रकल्प वर्ग 8 वीच्या कु खुशाली पाटील व नव्या भीमटे यांनी सादर करून श्रीमती एम एल कोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून ” विद्युत जनित्र ची निर्मिती” हा प्रकल्प वर्ग 10 वी च्या आदित्य वारकर व वंश सोनेकर यांनी सादर करून श्री संजीव डी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. ” अन्न व शेतीच्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती” हा प्रकल्प वर्ग 11 वीच्या कु परी यादव, आदित्य गुजरमाळे व प्रशांत भुरे यांनी सादर करून श्रीमती डी पी कुरुडकर यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. उपरोक्त विज्ञान प्रदर्शनात “अन्न व शेतीच्या कचऱ्यापासुन वीजनिर्मिती” या प्रकल्पाला तालुक्यातून प्रथम स्थान प्राप्त झाले. हा प्रकल्प तालुक्यातून जिल्हास्तरावर तालुक्याचे नेतृत्व करणार असून सर्वांनी विद्यार्थी व मार्गदर्शन शिक्षकांचे कौतुक करुन अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनीलबाबू केदार, सचिव सुहासताई केदार, शाळा समितीचे उदयजी महाजन, दिवाकरजी घेर, दुलीचंदजी कुंभारे, अरूनाताई शिंदे, दामोदरजी हाते, प्रकाशजी माटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुणजी वडस्कर, उपमुख्याध्यापक चंद्रशेखर लिखार, पर्यवेक्षक प्रमोदजी ईखे, पद्माकरजी राऊत,