शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो.-डॉ देवेश कांबळे
Summary
शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो.-डॉ देवेश कांबळे से.नी.जयदास सांगोडे यांच्यासह शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न ब्रम्हपुरी प्रतिनिधि :- शिक्षक कधीही निवृत्त होत नसतो तर तो शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला दिशा देण्याचे, मार्गदर्शकाची काम करीत असतात.आपण सेवेतून निवृत्त झाले.याप्रसंगी हा जो सत्कार करण्यात […]
शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो.-डॉ देवेश कांबळे
से.नी.जयदास सांगोडे यांच्यासह शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न
ब्रम्हपुरी प्रतिनिधि :- शिक्षक कधीही निवृत्त होत नसतो तर तो शेवटच्या श्वासापर्यंत समाजाला दिशा देण्याचे, मार्गदर्शकाची काम करीत असतात.आपण सेवेतून निवृत्त झाले.याप्रसंगी हा जो सत्कार करण्यात आला तो सत्कार म्हणजे यापुढे जी काही उणीव तुमच्या कार्यातून अनवधानाने राहून गेली असेल ती भरून काढण्याची संधी पुन्हा मिळणार आहे.तुमच्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा येणाऱ्या पिढीस प्रेरणादायी ठरून सृजनशील नागरिकांची फळी निर्माण होणार असे प्रतिपादन स्थानिक बैरी.राजाभाऊ खोबरागडे बी. एड.महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रहार संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे बोलत होते.
प्रहार शिक्षक संघटना ब्रम्हपुरी/ नागभीड यांच्या वतीने सेवा निवृत्त शिक्षक तथा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांच्यासह संजय काकडे, शरयू बांबोळे, रेखा रामटेके, सुरेश गजभिये, मिलिंदा नंदेश्वर, संघपाल ढवळे,चंद्रशेखर जिभकाटे, सूरदास कापगते, अशोक मुंगले, सूर्यभान टेंभुर्ण, प्रभाकर पराते, सुदेश हेजिब, शामराव गेडाम यासेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, उ्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, विशेष अतिथी संजय पुरी, गटविकास अधिकारी, अविनाश राऊत, युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनोज वठे उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्हातील प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व तालुका अध्यक्ष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष मुन्ना येरने, सरचिटणीस देवानंद तुडकाने, महिला अध्यक्ष स्मिता पिल्लेवान , सरचिटणीस वेणूताई मलोडे- पाल, नागभिड , कार्याध्यक्ष संजय सोनकुसरे,तालुका अध्यक्ष संजय काकडे, सरचिटणीस मंगेश नंदेश्वर, महिला अध्यक्ष छाया जांभुळे_ रामटेके, सरचिटणीस आरती रामटेके , कार्याध्यक्ष रामेश्वर भोयर, जयगूरू मेश्राम, ईश्वर पिसे, प्रेमचंद मलोडे, नरेंद्र इनकने, विजय बोदेले, सुमित भसारकर, चंदू शेंडे , ईश्वर बुरबांध्ये यांनी केले. कार्यक्रमांचे प्रास्थाविक देवानंद तुडकाणे यांनी केले.कार्यक्रमांचे संचालन आरती रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन छाया जांभुळे यांनी केले.