शिक्षक अनिल नागपुरे यांचा सेवानिवृतीपर सत्कार
शिक्षक अनिल नागपुरे यांचा सेवानिवृतीपर सत्कार
कन्हान : – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निलज, पंचायत समिती पारशिवनी येथील पदवीधर विषय शिक्षक श्री अनिल विठोबा नागपुरे जिल्हा परिषदेच्या सेवेतुन स्वेच्छेने सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
गुरूवार (दि.३) मार्च ला उच्च प्राथमिक शाळा निलज येथे आयोजित कार्यक्रमात श्री.व्यंकटराव कारेमोरे जि प सदस्य यांचे शुभहस्ते सरपंच सौ.आशा ताई पाहुणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजुजी पाहुणे, केंद्रप्रमुख सौ.लता माळोदे, वंदना बंड, मुख्या ध्यापक लता वंजारी यांचे प्रमुख उपस्थितीत (दि.२८) फेब्रुवारी २०२२ ला पदवीधर विषय शिक्षक श्रीअनिल विठोबा नागपुरे हे स्वच्छेने सेवानिवृत्ती निमित्य त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन धनराज बोडे सर यांनी तर आभार सुधाकर मोहरले यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता लता वंजारी, सुधाकर मोहरले, लता जळते, धनराज बोडे आदीनी प्रयत्न केले.
संजय निंबाळकर
