BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

शिक्षकाचे ऋण विद्यार्थ्यांनी सतत स्मरणात ठेवावे. – अरविंदकुमार रतुडी सेवादल महिला महाविद्यालयात विद्यार्थी पालक सभा संपन्न ————————————–

Summary

शिक्षकाचे ऋण विद्यार्थ्यांनी सतत स्मरणात ठेवावे. – अरविंदकुमार रतुडी सेवादल महिला महाविद्यालयात विद्यार्थी पालक सभा संपन्न ————————————– शिक्षक हा विद्यार्थ्यांचा किंबहूना देशाचाही भागयविधाता असतो. निस्वार्थ भावनेने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना शिक्षक आपल्या प्रतिभेने पैलू पाडून विद्यार्थ्यांचे जिवन तेजोमय करित असतो. म्हणून […]

शिक्षकाचे ऋण विद्यार्थ्यांनी सतत स्मरणात ठेवावे.
– अरविंदकुमार रतुडी
सेवादल महिला महाविद्यालयात
विद्यार्थी पालक सभा संपन्न
————————————–
शिक्षक हा विद्यार्थ्यांचा किंबहूना देशाचाही भागयविधाता असतो. निस्वार्थ भावनेने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना शिक्षक आपल्या प्रतिभेने पैलू पाडून विद्यार्थ्यांचे जिवन तेजोमय करित असतो. म्हणून शिक्षकांचे ऋण विद्यार्थ्यांनी सदैव स्मरणात ठेवावे असे आवाहन सुप्रसिद्ध समाज सेवक व सेवादल महिला महाविद्यालयाच्या पालक संघटनेचे अध्यक्ष श्री.अरविंदकुमार रतुडी यांनी केले.
सेवादल महिला महाविद्यालयात आयोजित पालक विद्यार्थी सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयजी शेंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे, माजी नॅक कोआर्डिनेटर डॉ.अनिल मोहीते, आजी नॅक कोआर्डिनेटर डॉ. प्रवीण देशपांडे, माजी विद्यार्थीनी प्रतिनिधी प्राची सुर्यवंशी उपस्थित होत्या.
यावेळी सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.संजयजी शेंडे यांनी महाविद्यालयात सुरू असलेले विविध अभ्यासक्रम व नव्याने सुरू होणार असलेल्या अभ्यासक्रमा बद्दल विस्तार पूर्वक माहीती दिली. तसेच माजी विद्यार्थिनी व पालकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे यांनी महाविद्यालयाच्या तीस वर्षाच्या कारकीर्दीत महाविद्यालयातील एकही प्रकरणाची साधी तक्रार पोलीस स्टेशनला नाही की एकही प्रकरण न्यायालयात गेले नाही. विद्यार्थी,पालक, शिक्षकांनी अतिशय हेल्दी वातावरण ठेवले. त्यामुळे आम्ही महाविद्यालयाचा शैक्षणिक,सामाजिक दर्जा वाढवू शकलो. याचे श्रेय आम्हा सर्वांचे मिळून आहे,असे विचार व्यक्त करित सर्व माजी विद्यार्थिनी व पालकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी नॅकचे माजी कोआर्डिनेटर डॉ. अनिल मोहीते यांनी महाविद्यालयात नॅक टीमचे महत्व काय? यात पालक व विद्यार्थ्यांची भुमिका काय? हे सविस्तर विशद केले.
यावेळी माजी विद्यार्थिनी प्रतिनिधी प्राची सुर्यवंशी तसेच इतर विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
सभेचे सूत्रसंचालन डॉ.अजय डोरलीकर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. प्रिया चहांदे यांनी केले.
सभेला पालक व माजी विद्यार्थिनींचा उदंड प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *