BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

शिक्षकाचा हकनाक बळी प्रकरणांत प् प्रहार शिक्षक संघटनेने दिली आंदोलनाची नोटीस

Summary

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची रक्कम वेळेवर न मिळ्याल्यामुळे योग्य उपचारासाठी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा परिषद चंद्रपूर च्या नाकर्ते पणामुळे एका मागासवर्गीय शिक्षकांचा हकनाक बळी गेल्यामुळे आंदोलन व घेराव करण्याबाबत प्रहार संघटनेने निर्णय घेतला आहे. , चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये मागील चार […]

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची रक्कम वेळेवर न मिळ्याल्यामुळे योग्य उपचारासाठी रक्कम उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा परिषद चंद्रपूर च्या नाकर्ते पणामुळे एका मागासवर्गीय शिक्षकांचा हकनाक बळी गेल्यामुळे आंदोलन व घेराव करण्याबाबत प्रहार संघटनेने निर्णय घेतला आहे.
, चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये मागील चार पाच वर्षांपासून वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक शासन निधी अभावी प्रलंबित आहेत. शिक्षकांनी आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावर स्वतः शिक्षकाने बचत गट, इतर माध्यमातून कर्ज काढून उपचार घेतले व जिल्हा परिषद चंद्रपूर कडे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक सादर केलीत. जिल्हा परिषद चंद्रपूर कडून वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक पंचायत समिती ला मंजूर झालेत. परंतु निधी नसल्यामुळे ते देयक प्रलंबित आहेत. असताच पुन्हा कोरोना -19 ने शिक्षकांना बाधित केलेत त्यावर सुद्धा लाखो रुपये खर्च केलेत ते त्या उपचाराचे खर्चाचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक सादर केलीत ते सुद्धा मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. पंचायत समिती मूल अंतर्गत जिल्हा परिषद शाळा, उश्राला येथील श्री. मधुकर गेडाम यांना मागील वर्षात हार्ट सर्जरी करावी लागली. त्यासाठी जवळ असलेल्या रक्कमेतुन त्यांनी हॉस्पिटल चे बिल चुकते केले व वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे सादर केलेत. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कडून मंजूर होऊन पं. स. मूल ला देयकाची रक्कम देण्यासाठी पाठविण्यात आले. अशातच पुन्हा श्री. मधुकर गेडाम, स. शी. यांना पुन्हा ब्रेन ह्याम्रेज झाले. त्यांना चंद्रपूर येथील डॉ. कुबेर यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना दररोज 30 ते 40 हजार रुपयाचा खर्च होता. त्यांच्या पत्नीने उसणवार करून खर्च केला.
वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजूर होऊन पं. स. मूल ला लेखा विभागात प्रलंबित होते. ते देयक मंजूर करावे यासाठी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ), शिक्षणाधिकारी (प्राथमिक )व गटविकास अधिकारी पं. स. मूल यांना व्हाट्सअपवर मेसेज करून श्री. मधुकर गेडाम स. शी. यांचे कोणत्या तरी खात्यातून रक्कम उसणवार घेऊन वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी अशी विनंती करण्यात आली. विनंती करूनही काहीच उपयोग झाला नाही. अखेर श्री. गेडाम सर, यांच्या पत्नीने खाजगी हॉस्पिटल मधील बिल देणे परवडत नसल्यामुळे शासकीय हॉस्पिटल मध्ये हलविले, शासकीय हॉस्पिटल मध्ये योग्य तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे त्यांची दि.30 मे 2021 रोजी पहाटे रोजी निधन झाले. त्यांचे निधन हे जिल्हा परिषद चंद्रपूर च्या नाकर्ते पणामुळे झाले असून त्यांच्या मृत्यूस जिल्हा परिषद चंद्रपूर चे प्रशासन जबाबदार आहेत. जिल्हा परिषद च्या जबाबदार अधिकारी यांच्यावर उचित कारवाई करावी. कारवाई न झाल्यास प्रहार शिक्षक संघटना ही प्रत्येक पीडित शिक्षक व पीडित कुटुंब यांच्या कडून स्वतंत्र पणे याचिका राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, दिल्ली यांच्या कडे दाखल करण्यात येईल. तसेच आमचे नेते व प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांच्या नेतृत्वात जिल्हा भर आंदोलन करून चंद्रपूर जिल्हाचे पालक मंत्री ना. विजय वाडेट्टीवार, यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने घेराव केला जाणार आहे. तरी तात्काळ जबाबदारी निश्चित करून कारवाई करून तात्काळ सर्व शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजूर करण्यात यावे.वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकासाठी शासनाकडून निधी अप्राप्त असल्यामुळे शिक्षक कर्जाच्या ओझ्याखाली आ शासनाने ही रक्कम तात्काळ अदा करण्यासाठी वित्तीय तरतूद करावी. तसेच या कालावधीत अनेक शिक्षक आजारी रजेवर होते त्यामुळे त्यांचे त्या कालावधीचे रजेचे वेतन सुद्धा प्रलंबित आहे व चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी अजूनही भविष्य निर्वाह खात्यात जमा झाली नाही .जे शिक्षक नियत वयोमानानुसार जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेत. परंतु निवृत्ति नन्तरहि त्यांना त्याचे लाभ मिळाले नाही.अंतिम भ. नी. नी. खात्यात जोपर्यंत सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकी रक्कम जमा होत नाही तोपर्यंत त्यांना त्यांची जमा रक्कम मिळणार नाही व व्याजास सुद्धा मुकावे लागेल. मा बच्छु कडु राज्यमंत्री यानी तात्काळ निर्णय घेऊन चंद्रपूर जिल्हा परिषदेला वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, रजा प्रकरणे व सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकी साठी 20 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्रहार शिक्षक संगटणा जिल्हा सरचिटणीस विनोद लांडगे यांनी प्रसिधदीपत्रका व्दारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *