शिक्षकांच्या cmp वेतन प्रणालीत बँकेचा प्रवक्ता म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे परिपत्रक निर्गमित
चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन cmp प्रणाली द्दारे करण्याचे निश्चित झाले आहे. राज्यात अनेक जिल्हा परिषद मध्ये cmp प्रणाली लागू करण्यात आली आहे,परंतु त्या जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाने शासन परिपत्रकात समाविष्ट असलेल्या बँकाचा समावेश आहे. Cmp वेतन प्रणाली लागू करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेने अमुक बँकेतून वेतन घेण्यासाठी आग्रह केला नाही व तसे शासन निर्णयात सुद्धा नमूद नाही. असे असताना, चंद्रपूर जिल्हा परिषदे चे शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे यांनी शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन 17 ऑगस्ट 2021 ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून cmp प्रणाली द्दारे वेतनाचे खाते शालार्थ मध्ये समाविष्ट करावे असे नमूद करून शिक्षकांना राष्ट्रीयकृत बँकेकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा पासून वंचित करीत आहात, हे शासन निर्यायाच्या विरोधात असून आपण निर्गमित केलेले दि.17 ऑगस्ट 2021 चे पत्र तात्काळ मागे घेऊन हा निर्णय मागे घ्यावा असे निवेदन प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी शिक्षणाधिकारी प्राथ यांना निवेदन दिले असून त्या निवेदनाच्या प्रति राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चू कडू व चंद्रपूर जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. तात्काळ 17 ऑगस्ट 2021 चे परिपत्रक मागे न घेतल्यास प्रहार शिक्षक संघटना शिक्षक हितासाठी आंदोलन जयदास सांगोडे, जिल्हा अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना, जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.cmp वेतन प्रणाली चा निर्णय हा शिक्षकांना बँक निवडन्यासाठी म्हणून माहे सब्टेंबर पेड इन ऑक्टोबर 2021 च्या वेतनापासून लागू करावे. नाहीतरी एक आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही सोई सुविधा नसताना त्यांनी cmp वेतन प्रणाली नागपूर विभागात प्रथम लागू केली आहे. जिल्हा परिषद मधील प्रथम श्रेणी अधिकारी, वर्ग दोनचे अधिकारी हे आपले वेतन शासनाकडून राष्ट्रीयकृत बँकेतुन घेऊन, राष्ट्रीयकृत बँकेच्या आकर्षक सोयी सुविधा घेतात परंतु आपल्या कडून मात्र आपल्या अधिनिस्थ कर्मचारी यांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तुटपुंज्या सोयी सुविधा वर बोळवण करून आर्थिक नुकसान करीत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही असे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र रायपुरे ,विनोद लांडगे जिल्हा सरचिटणीस ,अमोल खोब्रागडे जिल्हा संपर्क प्रमुख, नागेश सुखदेवे जिल्हा कोषाध्यक्ष, मुन्ना येरणे,मिलिंद खोब्रागडे, विलास बन्सोड, सुधीर वैद्य, नरेंद्र इनकणे, आशा कारवटकर, शर्मा, मिरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
देवेन्द्र रायपुरे
जिल्हा कार्याध्यक्ष