शिक्रापूर विद्याधाम जुनियर कॉलेज येथे संमोहनाद्वारे अभ्यास व एकाग्रताकरिता मार्गदर्शन
Summary
नुकतेच शिक्रापूर येथील विद्याधाम जूनियर कॉलेज येथे डॉ. जगदिश राठोड यांचे संमोहन स्टेज शो द्वारे विद्यार्थ्यांकरिता मनाचे व्यवस्थापन व एकाग्राता वाढविण्या करिता कार्यशाळा थाटात संपन्न झाली या वेळेस विद्याधाम प्रशाला ज्युनियर कॉलेज येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संमोहांतज्ज्ञ डॉ जगदिश […]
नुकतेच शिक्रापूर येथील विद्याधाम जूनियर कॉलेज येथे डॉ. जगदिश राठोड यांचे संमोहन स्टेज शो द्वारे विद्यार्थ्यांकरिता मनाचे व्यवस्थापन व एकाग्राता वाढविण्या करिता कार्यशाळा थाटात संपन्न झाली
या वेळेस विद्याधाम प्रशाला ज्युनियर कॉलेज येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संमोहांतज्ज्ञ डॉ जगदिश राठोड यांनी प्रथम समोहनाचे टेस्ट घेउन अभ्यासा व एकाग्रता कसी वाढावी हे सांगीतले.
याप्रसंगी विद्याधाम प्रशाळेचे प्राचार्य गद्रे सर व इतर प्राध्यापक उपस्थित होते
याप्रसंगी संमोहन तज्ञ प्राचार्य डॉक्टर जगदीश राठोड यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संमोहनातून एकाग्रता गाठून कशाप्रकारे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवल्या जाते याबाबत अतिशय चांगल्या प्रकारे विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले याप्रसंगी सर्वप्रथम काही विद्यार्थ्यांना संमोहित करून त्यांच्याकडून विविध प्रकारचे प्रात्यक्षिक करून घेतले आपल्या शरीर व मन यांचे अतिशय चांगल्या प्रकारचे कोऑर्डिनेशन असते मन म्हणजे मेंदू जसं सांगेल त्याच प्रकारे प्रत्येक कार्य आपल्या शरीराकडून घडत असते त्याच प्रकारे अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याकडून कित्येक गोष्टी मला आठवण राहत नाही असं न म्हणता प्रत्येक गोष्ट मी वाचलेली माझ्या लक्षात राहणार आहे आणि ते मी सहजपणे आठवून सांगणार आहे अशा प्रकारच्या सूचना जरी आपल्या मनाला दिल्या तरी मन अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करून चांगल्या प्रकारे आपण आपल्या मनाला ट्रेन करू शकतो त्यालाच माईंड ट्रेनिंग असे म्हणतात माईंड ट्रेनिंग व माईंड मॅनेजमेंट याद्वारे मनाची एकाग्रता वाढून प्रत्येक विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवल्या जाऊ शकते फक्त याकरिता मनावर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे एवढे जरी केले तरी निश्चित स्वरूपात विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवून अतिशय चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकते असे प्रात्यक्षिकातून संमोहनतज्ञ प्राचार्य जगदीश राठोड यांनी सांगितले .
याप्रसंगी ज्युनिअर कॉलेज येथील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते