शिकाऱ्याचीच झाली शिकार दोन बिबट्यांमधे (टेरिटोरियल फाईट)वर्चस्वाचे भांडणात एकाचा मृत्यू कोंढाळी वन परिक्षेत्र कामठी मासोद येथील घटना

कोंढाळी वन परिक्षेत्रातील घुबडी उपवनपरिक्षाता अंतर्गत येणाऱ्या कामठी (मासोद) गावा लगत २९ जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास अंदाजे एक वर्षाचा बिबट मृत अवस्थेत आढळून आला.
कोंढाळी वनपरिक्षेत्रातील कामठी येथे यादव पंजाबराव बरगट यांचे घारातील अंगणात बांधलेली बकरी दिसून न आल्याने यादवराव बरगट व गावकरी बकरीचा शोध घेत असता अगदी गावालगतच्या पुनम नवनीत कोठारी यांचे शेतात बकरीला बिबट्या ने मारल्याचे दिसून आले, याच दरम्यान याच शेताचे धुर्यीलगतचे नाल्याचे बाजूला अंदाजे दिढ ते दोन वर्षीय बिबट ही जखमी अवस्थेत मृत बिबट दिसुन आल्याने गावात एकच खळबळ उडाली, या घटनेची माहिती कोंढाळी वनविभागाला देण्यात आली.
घटनेचे गांभिर्य पाहता कोंढाळी वन परिक्षेत्राच्या घुबडी उपवनपरिक्षेत्र अधिकारी गजानन शेटे, वनरक्षक व्हि आर सावंत,एस एस शिसोदे,ए एक गडलिंग तथा टी बी राठोड वन कामगार किशोर कुसळकर, पुंडलिक सरोदे घटना स्थळी पोहचले. कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांची बदली झाल्याने येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर कळमेश्वर चे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण शिरपुर यांना माहिती दिली.त्यांना माहिती मिळताच ते ही घटना स्थळी पोहचले.
एकीकडे यादव पंजाबराव बरगट यांची बकरी मारली व लगतच बिबट मृत ( जबड्यावर, कानाखाली, गळ्याला,छातीवर, मानेवर जखमा दिसत होत्या) बिबट्या चां पंचनामा करून मृत्य बिबट्याचे शव विच्छेदनासाठी नागपूर येथील सेमिनरी हिल येथील वन विभागाचे पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी यांचे कडे पाठविण्यात आले आहे. सेमीनरी हिल येथील वन्य प्राणी संरक्षण केंद्रातील डॉ सुजित कोलगंत डॉ ईरोज सोमकुंवर , डॉ प्रियल चौरागडे, द्वारा मानद वन्यजीव रक्षक उदयसिंह यादव तथा पी सी सी एफ वन्य जीव प्रतिनिधी -कुंदन हाते व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थित शव विच्छेदन व मृत बिबटाचे शव दहन करण्यात आले.
अशी माहिती वन अधिकारी प्रविण शिरपूरकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शवविच्छेदनातून समजले की की दोन बिबट्यांचे आपसी (टेरिटोरियल फाईट) भांडणात एकाचा मृत्यू झाला आहे .
वनविभागाच्या वैद्यकीय अधिकारी यांचे कडे आलेल्या शव विच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे की दोन बिबट्यांचे लढाई लहान बिबट्याचा मृत्यू झाला आहे. असे प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी शिरपूरकर यांनी सांगितले आहे.
कोंढाळी/हिंगणी बफर/तसेच कारंजा घाडगे या तीन वन परिक्षेत्रातील सीमेवर असलेल्या कामठी,मासोद,मेट, धानोली, खापा,धोतीवाडा, जाटलापूर, व लगतच्या भागातील शेतकरी व गोपालक,शेळी पालन करणारे शेतकरी व गोपालकांचे बोर व्याघ्र प्रकल्पातून येणारे बिबट,वाघ, अस्वल यांचे कडून गायी,कालवडी, गोर्हे, बकर्यां तसेच मनुष्य हानी पोहचविल्या जात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी वन विभाग तसेच या भागातील जनप्रतिनिधी आमदार/ खासदार/यांनी स्थानिक शेतकरी, शेतमजूर, कामगार, शाळेकरी विद्यार्थ्यी, तसेच वाटसरूंची सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करावी, यात तिन्ही वनपरिक्षेत्रा मिळून नियमित वन गस्त दस्ता नेमावा, त्यचा प्रमाणे कामठी मासोद दरम्यान वन सफारी गेट बनविण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.