महाराष्ट्र रोजगार हेडलाइन

शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 5 मार्च पासून 42,000 वीज कामगार बेमुदत आंदोलनावर जाणार

Summary

         7 फेब्रुवारी 2024 रोजी वीज कंत्राटी कामगार कृती समितीने महाराष्ट्र प्रशासन व वितरण पारेश व निर्मिती वीज कंपनी प्रशासनाला आंदोलनाची नोटीस देऊन देखील शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवार दि. 5 मार्च पासून 42,000 वीज कंत्राटी […]

         7 फेब्रुवारी 2024 रोजी वीज कंत्राटी कामगार कृती समितीने महाराष्ट्र प्रशासन व वितरण पारेश व निर्मिती वीज कंपनी प्रशासनाला आंदोलनाची नोटीस देऊन देखील शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवार दि. 5 मार्च पासून 42,000 वीज कंत्राटी कामगार बेमुदत आंदोलन करणार आहेत.

या आधी 48 तासाच्या काम बंद आंदोलनाचा परिणाम होऊन महावितरण च्या महसुलास खिळ बसला, वीज निर्मितीसाठी अडथळा झाला आता ऐन उन्हाळ्यात हे कामगार बेमुदत आंदोलन करणार असल्याने नागरिकांना याची झळ बसनार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे

हे आंदोलन होऊ नये जनतेला वेठीला धरले जाऊ नये व अन्यायग्रस्त कामगारांनाही न्याय मिळावा या हेतूने नागपूरचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 9 फेब्रुवारी रोजी प्रधान सचिव ऊर्जा यांना पत्र देऊन कृती समितीची मिटिंग लावण्याची विनंती केली. कायम कामगारांच्या संघटनांनी देखील आंदोलना पाठिंबा दिला व मिटिंग लवकर लावण्याची विनंती केली मात्र या सर्व विनंत्या कडे महाराष्ट्र शासन आणि वीज कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आता आंदोलन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या आंदोलना दरम्यान एका कामगाराचा उष्णतेने बळी गेल्याने कामगार वर्गात प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे.

महावितरणचे 22,000 तर महानिर्मितीचे 18000 आणि महा पारेषण चे सुमारे 3000 कामगार या आंदोलनात उतरणार आहेत

ऊर्जामंत्री यांनी बैठक न बोलावल्यास 5 मार्च 2024 च्या मध्यरात्री पासून होणारे बेमुदत आंदोलन अटळ आहे असे निमंत्रक रोशन गोस्वामी यांनी सांगितले.

तीन कंपन्यांचे आंदोलन असतांना केवळ महनिर्मिती कंपनीच्या औद्योगिक संबंध अधिकाऱ्याने 5 मार्च रोजी 4 वाजता समितीला चर्चेला बोलवले आहे.

4 मार्च राष्ट्रीय लाईनमन दिवस आहे संवाद व चर्चेतून संप टाळता आला असता मात्र ऊर्जामंत्री व प्रशासन जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याने आंदोलन करणारच असा पवित्रा एकत्र रित्या सर्व कामगार संघटनांनी घेतला असे राज्य संघटक सचिन मेंगाळे यांनी सांगितले

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 करिता

सचिन मेंगाळे ( राज्य संघटक )
मो: 9422037029

रोशन गोस्वामी ( राज्य निमंत्रक )
मो: 7385521690

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *