शासनाच्या विविध घरकुल योजनेकरिता ५ब्रास मोफत वाळु या योजनेचे लाभ घ्यावा असे आव्हान आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे
Summary
शासनाच्या विविध घरकुल योजनेकरिता ५ब्रास मोफत वाळु उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी आज पासून घारकुरोडा, निरज बु.,देव्हाडीखुर्द,ढीवरवाडा,मोहगावदेवी, व बोथली*, या घाटावर वाळु वितरित करण्यात येणार आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा गावातील घाटावर रेती वाटप शुभारंभ करण्यात आले. त्याप्रसंगी नरेशभाऊ ईश्वरकर सभापती […]

शासनाच्या विविध घरकुल योजनेकरिता ५ब्रास मोफत वाळु उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी आज पासून घारकुरोडा, निरज बु.,देव्हाडीखुर्द,ढीवरवाडा,मोहगावदेवी, व बोथली*, या घाटावर वाळु वितरित करण्यात येणार आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा गावातील घाटावर रेती वाटप शुभारंभ करण्यात आले. त्याप्रसंगी नरेशभाऊ ईश्वरकर सभापती जिल्हा परिषद भंडारा, अशोकजी राऊत सरपंच रोहा, तहसीलदार मोहाडी, व इतर शासकीय कर्मचारी* व घरकुल लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. मोहाडी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना नि. शुल्क रेती ५ब्रास शासनाकडून मिळणार आहे. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना यांच्या फायदा होणार आहे. रेती वाटप कालावधी निश्चित केली आहे यांची संपूर्ण माहिती तहसीलदार मॅडम यांनी सांगितले आहे. दिनांक ०१/६/२०२५ ते दिनांक ०९/६/२०२५ रेती वाटप केली जाईल. संबंधित लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड ओळखपत्र दाखवून रेती घेऊन जावी , या योजनेचे लाभ घ्यावा असे आव्हान आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे.