BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

शासकीय डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर अंकुश लावा; ‘लोकशक्ती’च्या तक्रारीची पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल

Summary

भंडारा:         भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील अनेक शासकीय वैद्यकीय अधिकारी नियमबाह्यपणे खासगी प्रॅक्टिस करत असल्याची तक्रार लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेने केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी, भंडारा […]

भंडारा:
        भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील अनेक शासकीय वैद्यकीय अधिकारी नियमबाह्यपणे खासगी प्रॅक्टिस करत असल्याची तक्रार लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेने केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी, भंडारा यांनी पुढील सविस्तर कार्यवाहीसाठी हा तपास जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे वर्ग केला आहे.
​याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकशक्ती संघटनेचे प्रदेश महासचिव अमर भालचंद्र वासनिक यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि पोलीस प्रशासनाकडे जनहितार्थ तक्रार दाखल केली होती. शासकीय सेवेत राहून आणि शासन निर्णयानुसार (दि. ७ ऑगस्ट २०१२) ‘नॉन-प्रॅक्टिस अलाउन्स’ (NPA) घेऊनही अनेक डॉक्टर खासगी रुग्णालयांत सेवा देत असल्याचे पुराव्यासह निदर्शनास आणून दिले होते.
​या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र (संदर्भ: पोअभ/अर्ज शाखा-१२/३) पाठवून, बेकायदेशीर खासगी प्रॅक्टिसवर अंकुश लावण्याबाबत आणि शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत कळविले आहे.
​”शासकीय वेळेत डॉक्टरांनी गोरगरीब रुग्णांना सेवा देणे अपेक्षित आहे. मात्र, भ्रष्ट मार्गाने खासगी प्रॅक्टिस करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील,” असा इशारा संघटनेचे प्रदेश महासचिव अमर वासनिक यांनी दिला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले असून, आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *