शासकिय कामांसाठी आता शिवसेनेची हेल्पलाईन शहरात न येता ग्रामीण जनतेला होणार मोठी मदत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा अनोखा उपक्रम

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.16, कोरोना लॉकडाऊन काळात बस तसेच खाजगी वाहतूक व्यवस्था बंद स्वरूपात आहेत. मात्र विविध शासकीय कामांसाठी किंवा शासकीय तसेच ईतर कामासाठी मतदार संघातील जनतेला सिल्लोड येथील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात यावे लागते. यामुळे शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच ग्रामीण जनतेच्या आरोग्य सुरक्षा व सोयीसाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व मार्गदर्शनाखाली सिल्लोड तालुका शिवसेनेच्या वतीने एक हेल्पलाईन ची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी 9404279999 हा व्हाट्सअप नंबर देण्यात आला आहे.
ग्रामीण जनतेला शहरातील विविध शासकीय कार्यालये, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालया संबंधी सदरील हेल्पलाईन ची मदत घेता येणार आहे. वरील विषयी कामांसाठी काही अडचण किंवा तक्रार असल्यास 9404279999 या व्हाट्सअप नंबर वर सविस्तर आपली अडचण किंवा म्हणणे पोस्ट करावे या संबंधी निश्चित मदत केल्या जाईल. जर संपर्क साधने असल्यास मो.क्र. 8888778699 या नंबर वर आपण संपर्क करू शकतात. दरम्यान सदरील हेल्पलाईन मुळे सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण जनतेला शहरात न येता शिवसेनेच्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. सिल्लोड मतदार संघातील नागरिकांनी शासकिय कामे, तक्रारी , निवेदन इत्यादी कामासाठी सिल्लोड ला न येता या हेल्पलाईन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.