शाळेत प्रवेश करण्यासाठी पैसे नसल्याने विद्यार्थीची आत्महत्या

शाळेत प्रवेश करण्यासाठी पैसे नसल्याने विद्यार्थीची आत्महत्या अत्यंत दुःखाची बाब आहे.एकीकडे सरकार कोटी रुयाची जाहिरात करतात आणि सांगतात की सर्वांना शिक्षण मुफ्त दिल्या जाईल.आणि अशा घटना घडत आहे हीमहाराष्ट्र ची शोकांतिका आहे.
त्या मुलीला माहीत असेल की
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही.
म्हणून तिने शिकण्याची जिद्द धरली असेल ,तिला माहिती असेल घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे ,मी शिकणार तर घरची परिस्थिती बदलली जाऊ शकणार म्हणून ती प्रयत्न करत असणार.
विद्यार्थ्यांनो असे प्रकार कोणीही करू नका ,
काही अडचणी आल्यास नक्कीच मदत करू.
समाजात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळून देण्यासाठी मदत करणारे भरपूर लोक आहे .
मागील वर्षी भिम आर्मी संविधान रक्षक दलाचे संस्थापक मा. Prafulla Shende यांनी प्रत्येक जिल्ह्यातुन एक मुलगी शिकण्यासाठी दत्तक घेतली होती.
शिकण्यासाठी दानदाते यांनी पुढे येण्याची गरज आहे व त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था पैसे अभावी मुलाचे कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करतात त्याच्यावर ही कार्यवाही साठी आता पुढाकार घेण्यात यावा.
स्वाधार योजना , महाज्योती, डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह याची भेट घेऊन विद्यार्थीचे प्रश्न मार्गी लावू .
विद्यार्थी सोनिया तुला
भावपूर्ण श्रद्धांजली !
आपला
आशिष सोनटक्के